Five Types Ff Men On Earth, on earth we categorize men in five category, they are budh, mumuksh, sadhak sidh, sidhant. read about there behavior.
अध्यात्मिक — पृथ्वीवर पाच प्रकारचे पुरुष असतात, [ पुरुषांच्या भूमिकेचे प्रकार ]
१) बद्ध २) मुमुक्षु ३) साधक ४)सिद्ध ५) सिद्धांत असे पाच प्रकारचे पुरुष असतात , त्यांचा निर्णय बघून आपण कोणत्या अधिकारात आहोत हे वाचकाणे स्वानुभवाने ठरवायचे आहे. —
1) भूमिका पहिली [ बद्ध पुरुषाचा निर्णय ] — बद्ध पुरुषाची भूमिका ”स्थूल देह” हा अभिमानी असतो.मी माणूस आहे स्थूल देह हाच मी आहे मी आईचे पोटी नऊ महिने होतो, मी योनी द्वारे बाहेर आलो, मी काळा ,गोरा, लठ्ठ, बारीक, ठेंगणा, उंच, मी अमुक वयाचा, मी बाळ, तरून, म्हातारा, मी नारी ,किंवा पुरुष, मी या देशाचा,मला हात, पाय, कंबर, पाठ,पोट, कान, डोळे, नाक, तोंड, गुद, शिश्न, केस, नखे, डावे उजवें अंग, दाढी, वै. मी खातो, पितो, येतो, जातो वै. असे आपणास मानणारा तो बद्ध पुरुष जाणावा. यालाच ”स्थूल देह” अभिमानी म्हणतात.
२) मुमुक्षु {पुरुषाचा निर्णय} — या पुरुषाची भूमिका ”सूक्ष्म देह ” अभिमानी असतो स्थूल देह हा साडेतीन हातांचा उंच असणारा मी नाही. याचे आतून बोलणारा मी आहे मी कोणास दिसत नाही. मी स्थूल देहास वागवितो,हा स्थूल देह म्हणजे पोकळ आहे.मी आंत असल्यामुळेचं स्थूल देहांवर प्रेम करितात.नाहीतर प्रेत मानून जाळतात अगर गाडतात. मी देहाला जाणतो; मला देह जाणत नाही, स्थूल देह साडेतीन हात उंचीचा आहे. परंतु मी या देहा मध्ये केवढा व कोणत्या रंगाचा आहे. हे मला कळेना.स्थूल देह हा आईबापाच्या रक्त रेताचा झाला आहे; परंतू मी कशाचा आहे हे कळेना. हा देह मातेच्या पोटातून आला आहे; परंतु मी कोठुन आलो हे कळेना. हा देह अखेर स्मशानातच जाणार आहे.परंतू मी कथे जाणार आहे हे मला कळेना, मी कोण आहे हे मला कळावे या हेतूने साधू-संत सतपुरुषांस सद्गुरू मानून अनन्य भावाने शरण आहों, यासच ‘मुमुक्षु’ म्हणतात. श्री सद्गुरू नाथाला अनन्य भावे शरण जाऊन आत्मानुभव प्राप्त झाल्यावर मी ‘स्क्षुल’देह नसून स्थूल देहाचा साक्षी आहे, या जाणीवेला ”सूक्ष्म देह” अभिमानी म्हणतात.
३) साधक — भूमिका तिसरी { साधक पुरुषाचा निर्णय } साधक पुरुषाची भूमिका ”कारण देह” अभिमानी आहे. या साधकाचे प्रकार म्हणजे (१) चावट वाकडा साधक (२)सरळ सज्जन साधक त्यापैकी चावट वाकडा साधक याचा निर्णय-: आपण कोठून आलो आहे कोठे जाणार आहे हा विवेक सद्गुरूला अनन्य भावाने शरण गेल्या वाचून कळत नाही, सद्गुरूला अनन्य भावाने शरण न जाता रिद्धी-सिद्धी प्राप्त करून घेतो नाना चमत्कार लोकांस दाखवून आपण फसून दुसर्यास फसवितो.आणि अनेक शास्त्र पुराने वाचून वाद विवाद करण्याचे कामात पटाईतपणा दाखवून दुसर्यास मूर्ख ठरवितो.केलेल्या पाठांतराचे जोरावर अनुमान ”परोक्षज्ञानाने” ब्रम्ह, याला म्हणावे ब्रम्ह, त्याला म्हणावे आत्मा असा असतो अकर्ता; अजन्मा, अयोनीसंभगव, अजरमार, सर्वव्यापक, सर्वसाक्षी, सुख-दु:ख् रहित, उदय अस्तर हित आहे अश्या कोरड्या गप्पा मारण्यात हुशार असतो.व माझ्या सारखा जगात कोणी नाही असे तो आपणास मानतो. कोणी स्वानुभवी संत भेटले तर त्यांच्याशी नम्रतेने, लीनतेने, शांततेने बोलत सुद्धा नाहीत,एवढेच नव्हे तर तो माहात्म्यास मूर्ख मानून आपली कीर्ती वाढवण्या करीता नाना प्रकारचे यत्न, नाना प्रकारची उपासना, नाना प्रकारची आसने या खटाटोपी करतो;परंतु मी कोण याचा विचार करण्याकडे त्याचे मुळीच लक्ष नसते असा. परंतु ”मी” हे वर्म श्री सद्गुरूला अनन्य भावाने शरण जावून दृढ चरण धरल्या शिवाय ओळखताच येत नाही. पण पद्धत मुर्खाला यातील काहीच कळत नसून मला सर्व कळते अश्या घमेंडीत असतो. हे सर्व वर्णन झाले चावट साधकाचे.
Continue …
Source : Marathi Unlimited.