एका कलियुगाचा धर्म । पुत्र सांगे पित्यास काम ।
ब्राम्हण त्याजिती ब्रम्ह कर्म । एसे वर्तमान मांडले ।।
माया बहिणी दवडिती । स्त्री आपुली आणविती ।
एका एका नवल गती । अगा श्रीपती परियेसी ।।
भार्या न करीती पतीची सेवा। नाही कवणा धर्माचा हेवा ।।
वर्ततसे पापाचा ठेवा। अगा केशवा परीयेसी ।।
अरे वैराग्याचा घराचारू ।आणि संन्यास मोह थोरु ।
संता बहुत अहंकारु । रुसणे न लगे कोणासी ।।
जाला कलिचा प्रवेशु । तुम्हा नामाचा विश्वासू ।
हृदयी हृषीकेशु । विष्णूदास नामा ।।।।
Source : Marathi Unlimited