देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे हृद्य जळतसे ।।
हरणे पळती देखोनिया व्याघ्र । कापे थरथर तैशा परी ।।
अजासर्पन्याये कीटक भ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ।।
जेवितां बोलता शेजेसी तो निजे । आला आला मज मारावया ।।
नाशील हा आता दैत्याचे ते बंड । फाटलीसे गांड तेव्हा त्याची ।।
नामा म्हणे भये लागलेंसे ध्यान । चराचरी कृष्ण दिसतसे ।।।।