Bhagwan shiv swarup, Article based on bhagwan shiv swarup.
भगवान भोलेनाथ हे निजात्मस्वरूप, निरंजन, निराभास, निर्गुण, निर्विकार, निरामय, निरिहः, नित्यसत्य, सर्वातीत, शब्दातीत, प्रकृतिपर, परापर, परतम, प पंच मुखाच्या समग्रनादाद्वारे ”ओम” हा एकाक्षर बनलेला आहे. सर्वनाम-रूपात्मक जगत् , स्त्री-पुरुष, सर्व प्राणी-समुदाय तसेच चार वेद ”प्रणव” (ओम) मध्येरमानंदमय, परब्रम्ह आहेत. तसेच सर्वतंत्रस्वतंत्र सर्वोपरी, सर्वाश्रय, सर्वव्यापी, सर्वरूप, सर्वज्ञ, सर्वलोकमहेश्वर, सर्वनियन्ता, सर्वगत, सर्वशक्तिमान, अनेकलीलाविहारी हेच आहेत. आणि भगवान शिव वेदरूप, वेद्वेद्य, वेदज्ञान, प्रणवरूप आहेत. ‘प्रणव’त्यांचे वाच्य आहे व तेच वाचकही आहेत. तेच पंचानन (पंचमुख) होत उत्तरमुख अकार, पश्चिम मुख उकार, दक्षिण मुख मकार, पूर्व मुख बिंदू, मध्य मुखातून नाद उत्पन्न होतो. या व्याप्त आहे. ‘ओम’ म्हणजेच शिव-शक्तीचा बोधक आहे.
सृष्टी स्थिती, संहार, लय आणि अनुग्रह या पाच क्रियांच्या रुपात भगवान शिवाचीच लीला निरंतर प्रगट असते. यांत चिदरूपातील संबंध ‘अनुग्रहातून’ आणि आनंद रूपातील ‘लयातून’ व इच्छारूप, ज्ञानरूप व क्रियारूप यांचा संबंध ‘सृष्टी’ ‘स्थिती’ ‘संहार’ ‘अनुग्रह’ ‘लय’ या पाच रूपातून भगवान शिवाचे ‘इशान’ ‘तत्पुरुष’ ‘अघोर’ ‘वामदेव’ आणि ‘सद्योजात’ नावाने पाच मुख आहेत. यातच पंचमहाभूतां ची व्याप्ती मानल्या जाते. भगवान भोलेनाथाच्या पाच मूर्ती मध्ये प्रथम मूर्ती क्रीडा (नृत्य) दर्शविते, दुसरी तपस्या दर्शविते. तिसरी लोकसंहार दर्शविते चौथी प्रजासृष्टी करिते, पाचवी सव्द्स्तुयुक्त समस्त विश्वात आच्छन्न करून ठेवते. ईशानमूर्ती सर्वांना प्रभूस्वरूपात असते, वर्तमान सृष्टि-प्रलय रक्षा (संरक्षण) करनेवाली आहे. भगवान प्रभू शिवाची ईशानमूर्ती साक्षात प्रकृती भोक्ता-क्षेत्रज्ञ पुरुषात अधिष्ठित आहे आणि द्वितीय तत्पुरुष मूर्ती सत्वगुणाश्रीत भोग्य प्रकृतीत अधिष्ठित आहे. तृतिय अघोर मूर्ती धर्मादी-अष्टांगयुक्त बुद्धीत अधिष्ठित आहे चतुर्थ वामदेवमुर्ती अहंकारादि प्रकृती अधिष्ठित आहे. आणि पंचम सद्योजातमूर्ती हि मनो मनात अधिष्ठित आहे. तसेच भगवान शिव शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम. ईशान, महादेव आणि पशुपती नावाच्या अष्टमूर्ती क्रमश: पृथिवी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि क्षेत्रज्ञ (यजमान) मध्ये अधिष्ठित आहेत. या आठ हि रुपात त्यांचे पूजन केले पाहिजेत. भगवान शिवाचे तीन व्यूह आहेत, एकतीस प्रकार आहेत. तीन व्यूह म्हणजे शिव, सदाशिव आणि महेश्वर हे होत. त्यात शिव एकरूप, सदाशिव पंचरूप महेश्वर पंचविंशतीरूप होत. तसेच त्यांचे दुसर्या प्रकारचे चार व्यूह म्हणजे ब्रम्हा, काल, रुद्र आणि विष्णू यांचे आधारशील असून शक्तीचे प्रभवस्थान आहेत.
परात्पर परतम भगवान शिव त्रिदेव रूप नसून त्यांच्या ईछांनुसार प्रगट रजोगुणरूप धारण करनेवाले ब्रम्हा, सत्वगुणरूप धारण करनेवाले विष्णू, आणि तमोगुण रूप धारण करणेवाले रुद्र अवतारी जे उत्पत्ती, रक्षा, संहार चे कार्य करतात. हे तिन्ही वस्तुत: शिवाचीच अभिव्यक्ती आहे. हे एकेक नाहीत. परात्पर, परतमसदाशिव, महाविष्णू ई. स्वरूपत: एकच तत्व आहे. यात कोणतीही भेदबुद्धी किंवा उच्चनिच्चतेची भावना, राग-द्वेषयुक्त, स्तुती-निंदा करणे म्हणजे पाप किंवा पतन चे कारण आहे. ** भगवान ‘शिव’ म्हणजेच रुद्र हे अनादिकालीन देवता आहे आणि लिंग-पूजा हि सनातन आहे. शिवलिंग चिन्मय आहे. स्थुल-अंग विशेष नाही. चिन्मय आदिपुरुषाचे स्वरूपच ‘लिंग’ आहे. ज्या पासून चराचर विश्वाची उत्पत्ती झाली आहे. हेच ”कारण-स्वरूप” होत. लिंग-पीठ अर्थात प्रकृती म्हणजेच ”पार्वती” लिंग-चिन्मय परब्रम्ह ”पुरुष” होत. म्हणजेच पीठ ”अम्बामय” व शिवलिंग चिन्मय पुरुषमय होत. लिंग चा अर्थ चिन्ह होय. ** भगवान शिवाचे परिचालक चिन्ह ”लिंग” होय. शिव पुराणात लिंगाचे रूप सांगितले आहेत.हे समजून घेतल्यास या वरून कोणीच म्हणू शकत नाही कि हे मनुष्याचे शिश्न आहे. शिव पुराणात सांगितलेले आहे. कि सर्वात पहिला लिंग म्ह्णजे ज्योती-स्तंभरूप जो प्रणव, अर्थात (ओम) आहे. हे सूक्ष्म-लिंग प्रणव-रूप तसेच निष्कल आहे व स्थूल लिंग-संपूर्ण ब्रम्हांड होय. शिव-लिंगाची आकृती म्हणजे संपूर्ण ब्रम्हांडाचीच आकृती होय. शिव-लिंगात चराचर ब्रम्हांड समावलेले आहे. म्हणून एका शिव-लिंगाच्या पूजेत सूर्य, चंद्र, नारायण, लक्ष्मी या सर्व देवतांचे पूजन संपूर्ण होते. जसे भगवान विष्णूचे अव्यक्त ईश्वर रूपाचे प्रतिक ”शालग्रामरूप पिंडी” आहे, तसेच शिवप्रभूचे अव्यक्त ईश्वर रूपाची प्रतिमा म्हणजे ”शिवलिंग-पिंडी” आहे.
Source : Marathi Unlimited.