बरेच दिवसान पासून सुरु असलेल्या वाढला आज पूर्ण वीराम मिळाला आहे आणि शेवटी बाळासाहेबांचे समाधीस्थळ हटवलेच. पहाटे पावणे तीन वाजता हटवला चौथरा, हे काम एकदम शांतता पूर्वक करण्यात आले. शिवाजी पार्कवरील ( Shivaji Park) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं समाधीस्थळ शिवसैनिकांनी हलवलं आणि समाधीस्थळ हलवण्याची ही प्रक्रिया शांतपणे पार पडली. त्या पूर्वी तिथे पूजा अर्चना करण्यात आली. समाधीस्थळ हटवण्याच्या वेळेस बरेच पोलिस दल लावण्यात आले होते. त्या संधर्भात शिवाजी पार्कवर बऱ्याच घटना क्रम घडल्या. मात्र पोलिसांच्या शिस्थि मुले सर्व काम पार पाडण्यात आले. मात्र आता सध्या तरी शिवाजीपार्कात तणावपूर्ण शांतता आहे.
Source : Marathi Unlimited.