1
Ayushachya Saripathawar
आयुष्याच्या सारीपाटावर
‘ सोंगटी’ च रचता आली नाहीत’
डाव जिंकने तर दूरच
डाव मांडताच आले नाही……
राजा, वजीर, घोडे, हत्ती
सारेच विखुरले सारीपाटावर
नेमके कोणते स्थान कुणाचे?
‘हे’ कधीच उलगडलेच नाही
एकदा महत्प्रयासाने
डाव मांडीला सारीपाटावर,
पण ‘चेकमेट’ कधी मिळाला
अजूनही कळलेच नाही
पुनश्च डाव मांडताना
आयुष्य लागले उतरणीला
पटहि झाला जीर्ण,अन्
ध्येय गाठताच आले नाही
आयुष्याच्या सारीपाटावर
1