अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे याचं दु:खद निधन
Like
Like Love Haha Wow Sad Angry

anad abhyankar

 अभिनेते आनंद अभ्यंकर (Anand Abhyankar ), अक्षय पेंडसे ( Akshay Pendase )याचं अपघातात दु:खद निधन.  या दुर्घटनेमुळे मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. चित्रपटाचे शुटींग संपवून मुंबईला जाताना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या टेम्पो- कारच्या अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि अक्षय यांचा मुलगा प्रत्युष यांचे निधन झाले. तेथून मुंबईला परतत असताना पुणे-मुंबई द्रतगती महामार्गावर बऊर पुलाजवळील ऊर्से टोल नाक्यापर्यंत आल्यानंतर, पुण्याकडे जाणारा टेंपो रस्ता दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेला जाऊन अभ्यंकर चालवित असलेल्या मोटारीवर आदळला.  पुणे विद्यापीठाच्या आवारात आगामी `कोकणस्थ` ( Kokanast Movie )चित्रपटाचे रविवारी चित्रीकरण झाले. ते संपवून रात्री नऊच्या सुमारास सर्वजण कोथरूड येथील घरी गेले. बऊर गावानजीक रविवारी बारा वाजण्याच्या सुमारास टेम्पो- कारचा अपघात झाला.  सर्व जखमींना निगडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार चालू असतानाच अभ्यंकर, अक्षय पेंडसे व प्रत्युष या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर टेंपोचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Menu