Sukhi Marg Jiwanacha, Read this tips for good life. if you want simple and happy life then must follow this rules.
प्रत्येक दिवशी काही वेळ एकांतात बसून बघा, आणि मौन रहा शरीराचा एकांत आणि वाणीचा एकांत खूप लाभकारी व आवश्यक आहे. त्या एकांतात ईश्वराचे स्मरण करून ध्यान किंवा जप लावा, मनाचा एकांत आणि साधना धरा मनात काहीही विचार किंवा संकल्प न आणणे म्हणजे चित्त संपूर्ण निरविषय होऊन अचिंत्य परमात्म स्वरूपात लागले कि हे जग, शरीर, व मन हे विसरणे [काही क्षणा साठी का होईना] म्हणजे याची सवय करा. मग बघा जीवन किती हलके व सोपे वाटायला लागते. हा संयम फार आवश्यक आहे. तसेच वाणीचा संयम फार लाभकारी आहे. बिन आवश्यक गोष्टी बोलू नका. कुणाचीही निंदा, चुगली किंवा कुणाची भरभरून स्तुती करू नका, अश्लील शब्द उच्चारण करू नका, आणि दुसर्यांचे अहित, किंवा भावना दुखावतील असे बोलू नका, तसेच कडवे व असत्य बोलू नका, उत्तेजना पासून बचाव करा, संकटात हिम्मत बाळगा, धीर सोडू नका, या सर्व गोष्टीन पासून बचाव केला कि शारीरिक व मानसिक रोगांपासून आपण दूर राहाल.
कुणाचाही अनादर, द्वेष धरू नका, स्वत:च्या स्वार्था साठी दुसर्यास कष्ट देऊ नका, कुणी चांगले कार्य करीत असेल त्याला विनाकारण छळू नका, त्याला सहकार्य द्या, त्याचा उत्साह वाढवा. दिन, गरीब, रोगी यांच्या अडचणी समजून त्याना यथाशक्ती मदत करा. त्यांचे दु:ख कोणत्या स्वरूपाचे आहेत ते समजून त्या प्रकारे सहकार्य करा. हे समजून घेतल्यास त्या पेक्षा कितीतरी मदत प्रभू आपल्याला करतो हे विसरू नका. प्रभू आपल्या चांगल्या कर्मांत कोणत्या परी आपल्याला मदत करतो किंवा आपल्या वाईट कर्मांत आपल्याला कधी संकटात पाडतो हे आपल्या लक्षात येत नाही, तेव्हा चांगलेच कार्य करा. मनाच्या प्रेमात देवत्व व ऋषित्व आणि मनाच्या कपट वृत्तीत असुरत्व असते. जो मनुष्य मनाचा सरळ व शांत प्रवृत्तीचा असतो. भलेही त्याला बनावटी कार्यकुशलता नसेल, किंवा चतुर व कपटी मनुष्याच्या नजरेत तो मूर्ख ठरत असेल; लोकांच्या भ्रमपूर्ण दृष्टीने तो ऐहिक व उन्नती न करनेवाला ठरत असेल; पण (कपट-चातुर्याने स्वत:ला जो बुद्धीवान समजत असेल त्यापेक्षा ) तुम्हीच निश्चितच खूप उच्च स्तरावर आहात असे मानल्या जाते. आपल्या पापांना लपवू नका, आणि पुण्याईला प्रगट करू नका. पाप लपविल्याने पापात जास्त भर पडेल.पुण्य प्रगट केल्याने त्यात घट होईल हे लक्षात ठेवा, पुण्य कापूरा प्रमाणे असते त्याला उघडे ठेवल्याने ते उडून जातें. आणि पाप हि जहरी वस्तू आहे तिला बंद ठेवल्यास त्याचा जहरी वायू होतो. तो आपल्या सर्व चांगल्या भावनांना नष्ट करतो व सोबत संगतीत राहणार्या सर्वांना नष्ट करतो.
जीवनाच्या एकेक क्षणाला मौल्यवान समजा. प्रत्येक क्षणाला शक्य तितके आत्म चिंतन करा, प्रभू स्मरण करा, क्षण लोकहिताच्या कार्यात लावा, आपला एकही क्षण वाया घालवू नका, आपल्या मनात कधी नीच विचार आला कि समजून चला कि यात आपले आणि दुसर्यांचे नुकसान होणार आहे. त्या करीता त्याविचाराला तुरंत मनातून काढून टाका, त्या विचाराला मनात कघीच आश्रय देऊ नका. त्या कडे दुर्लक्ष करा. चित्तात नेहमी सतसंकल्प ठेवा, अविचार आल्यास ईश्वरमंत्र जाप चालू ठेवा, हळूहळू मन स्वच्छ होईल. अश्या प्रकारे परोपकार वाढत जावून मन शांतचित्त होईल, तुम्ही संन्मार्गी लागण्यास वेळ लागणार नाही. तुमच्या संगतीत दुसर्यालाही संमार्ग प्राप्त होईल. हाच ”शिवसंकल्प” होय हीच वेदांताची प्रार्थना होय.
Source : Marathi Unlimited.
1 Comment. Leave new
Swatache kalyan he mansane swatach karawe…