शिक्षण महर्षी

Like Like Love Haha Wow Sad Angry 71 प्रज्ञेची चढाओढ । अहर्ता मिळवावया गोड बालकाचे पुरवावया लाड । आता काही...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
71

shikshan maharshi

प्रज्ञेची चढाओढ । अहर्ता मिळवावया गोड
बालकाचे पुरवावया लाड । आता काही नको ।।१।।
असेल जर अमाप धन । कन्या पुत्रा हवे जे शिक्षण
ओतावे प्रसंगी धनदान । संस्था चालकांप्रती ।।२।।
न कष्टविता देहू । न अभ्यासिता ग्रंथ बहु
नकल साधुनिया पाहू ।कसोटिये उतरण्या ।।३।।
काही कष्टती स्वये पूर्व ।काही परिक्षेमाजी करी सर्व
काही तदनंतरही श्रमि अपूर्व । उतरावया कसोटी ।।४।।
कोणे एक समयी । शांतता दिसे विद्यालयी
सांप्रत गोंगाट ठायी ठायी । परीक्षेमाजी ।।५।।
याजसाठी असे अट्टाहास । संस्था उघडाया प्रयास
ओतुनि बहु दानरास । शिक्षणमहर्षी करी ।।६|।
आपुलिया राखावे । पारखिया सांडावे
ऐसे नित्यची करावे ।प्राचार्य गा ।।७।।
आपुलीयां प्रती प्रेमभाव । दुजांप्रती आकस भाव
संस्थाकार्यी प्रभाव । संस्था चालकांचा ।।८।।
जुने राजे सर्वही बुडाले । नवे शासन निर्मिले
संस्था रूपे तया तारिले । देऊनी अनुदाना ।।९।।
भोग भोगी जीवनी उदंड ।राखुनिया शासन दंड
चैन चाले अखंड । या आधारे ।।१०।।
विद्येची वहावया गंगा । नाच चाले सदा नंगा
लाचारीचिया अंगा । वेळी  प्रसंगी ।।११।।
तथापि ते असती भले ।भरोनिया आपुले गल्ले
गौरवी तयांना बोले । शिक्षण महर्षी हे ।। १२।।

कवि: श्री रामकृष्ण मुंदाफळे

Like
Like Love Haha Wow Sad Angry
71

Related Stories