बाळासाहेबनची प्रकृती चिंताजनक झाल्याने नेतेमंडळींनी `मातोश्री`वर धाव घेतली असली तरी त्यांना भेटण्या करिता कुणालाच परवानगी नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबां बद्दल चौकशी करून परतावे लागत आहे. राज्यपाल के. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शंकरनारायणन, नितीन गडकरी , गोपीनाथ मुंडे, गृहमंत्री आर. आर. पाटील, हुसेन दलवाई यांच्यासह विविध नेत्यांनी `मातोश्री`वर धाव घेतली होती. कोणत्याही नेत्याला शिवसेनाप्रमुखांवर उपचार सुरू असलेल्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. शिवसेनाप्रमुखांची प्रकृती बिघडल्यानंतर शिवसैनिकांची `मातोश्री` बाहेर झालेली गर्दी तसेच राज्याच्या अन्य भागांत वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. पण आता मात्र बाळासाहेबांची ताबियेत ठीक असल्याचे बोलले जाते. आता मात्र त्यांची प्रकृती ठीक आहे.
Source : Online Tv.
1 Comment. Leave new
I’ll right away grab your rss as I can’t find your e-mail subscription link or newsletter service. Do you have any? Kindly let me know in order that I could subscribe. Thanks.