माझी जीवन रेखा
खूप साधी
पण सरळ
अति निष्पाप
न तेज आवडे धोका ।।१।।
अंतरी प्रेम
अन्यायाचा द्वेष
न्यायाची आस्था
ढोंगाचा तिज राग धागा ।।२।।
असे असूया
सर्वाप्रती माया
सहनुभूती
रंग न व्हावा फिका ।।३।।
ईशाप्रती श्रद्धा
भूतांप्रति दया
तिजवरी तू
सहर्ष प्रेम करी रसिका ।।४।।
ती फुलावी
बहु फळावी
तुज आधारेच !
तुज चरणी हाच हेका ।।५।।
रामकृष्ण मंदाफळे