मानव तृष्णा!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Manav Truna, All human being are greedy they always demand for more, they want to live more, they want to earn more, this articles is based on human nature.

manav truna म्हातारपण येऊन  ठेपलेले आहे पण  मानवाची तृष्णा  कायम स्वरूपी  तशीच्या तशीच  राहते. शरीर थकले,  ईन्द्रिय काम करीत  नाही सर्व शारीरिक  व्यवहारान करीता  दुसर्यांवर अवलंबून  राहावे लागते.    तरीहि वाटते.  अजूनही थोडे जगले पाहिजे.  मुलां साठी थोडे काही करावे वाटते. औषधी उपचार करून अजूनही आयुष्य वाढवावे संसाराचे काही सुख भोगावे. मग तर मरणे आहेच, परिवारासाठी काही अपुरी कामे आहेत ती पूर्ण करावीत.  वै असे बर्याच वृद्धान कडून  ऐकल्या जाते.  यावरून हा दृष्टांत दिसतो कि मानवाची तृष्णा कायम स्वरूपी असते.  जो जो मनोकामनाची पुर्ती होते त्या मागे तृष्णा वाढतच जाते.  ज्याच्या जवळ रुपया आहे तो म्हणतो शंभरी हवी. नंतर हजाराची अपेक्षा, मग लाखाची नंतर करोडोंची संपत्ती हीच प्रत्येकाची ईच्छा,तसेच राजपद, राजापासून चक्रवर्ती,नंतर ईन्द्रपद,व त्यानंतर ब्रम्हपद, मग विष्णुपद व शिवपदाची कामना होत असते, या प्रकारे  तृष्णा वाढतच जाते, त्याची काही सीमा नसते. मनात कधी ईच्छा असते कि माझ्या जवळ भरपूर पैसा असता तर मी धार्मिक कार्य केले असते  पण पैसा आल्या नंतर सुद्धा वृद्धा अवस्था येवूनही धनाची तृष्णा वाढत जावून व्यवहारिक कार्य संपतच नाही.आणि धार्मिक कार्य होऊ शकत नाही.यालाच मानवी तृष्णा म्हटल्या जाते. जगातील सुख भोगांतील तृष्णा मुळे भगवंतापासून दूर लोटल्या गेले आहे. हे पिशाच्च भगवंत चिंतनात मन लागूच देत नाही. सदा सर्वदा सुख भोगांवर लक्ष केंद्रित करीत असते. म्हणूनच मनुष्य दु:खात लपेटून राहतो. सर्वात जास्त चिंता असेल ते या  तृष्णा मध्ये  हि तृष्णा महा-अंधकारमयी कालरात्री प्रमाणे सामाधानी पुरुषाला घाबरून सोडते,तेज नजरेस आंधळे बनविते, शांत प्रवॄत्तीत खळबळ  माजवितें.

संसार मध्ये मानवाच्या ज्या अनगिनत तृष्णा आहेत त्या मुळे मानवाला दु:ख च मिळणार जो व्यक्ती कधी घरा बाहेरही निघत नसेल त्यालाहि हि तृष्णा बाहेर पडन्यास भाग पाडते.व संकटात टाकते. हि महाअं- धक्कारमयी कालरात्री प्रमाणे असणारी तृष्णा धीर पुरुषालाही अधीर बनविते घाबरवून सोडते. या तृषणेपायी मनुष्य अपमान, लांछन, निर्लज्जता, दु:ख ईत्यादि सहन करतो. दु:खा मागून दु:ख येण्या साठी हि तृष्णाच कारणीभूत असते. मनुष्य कोणत्याही मार्गात संतोष  ठेऊ शकत नाही. आणि वेळोवेळी त्याची स्थिती बदलत जाते.या तृषणेपायी आयुष्यभर दौड धूप करूनही तो शेवट अपुराच राहतो. आणि एखादे वेळी भाग्यां- नुसार  भरपूर धन प्राप्त होतेही पण धनाचा सदुपयोग न झाल्याने तो असंतोषीच राहतो. म्हणून बुध्दिमान मनुष्याने भोगाच्या तृष्णे पासून दूर राहून सत्संग स्वीकारणे व परमात्म साधने योग्य आहे. भोगातून मानवाची कधीच तृप्ती होत नाही. ते अग्नीत तूप ओतल्या प्रमानेच आहे.हि मानवाची महाभयंकर दशा होय. हि कधिच विझू शकत नाही. त्यापेक्षा या तृष्णेत संतोषरुपी शीतलजल ओतून मनुष्याने सुख मिळविले पाहिजे. आजही या विश्वात असे अनेक धनाढ्य लोक तृष्णाच्या फेऱ्यात अडकून असंतोष व अतृप्तीच्या आगीत जळून स्मृति हरपून बसलेले आहेत. न्याया नुसार धन कमावून त्याचा सदुपयोग करण्यास मनाई नाही. पण अतिधनाच्या  लोभात पडण्याची काहीएक गरज नाही. शास्त्रातही  सांगितले आहे कि धन हे मदमस्त आहे याची मादकता मानवाला अमानुष बनविते. ज्यां व्यक्ती जवळ धन असूनही त्याची मादकता चढली नाही ते धन्य मानावे लागेल. पण असे फार कमी लोक आहेत. जे स्वत:ला महान, किंवा साधक समजतात त्यांनी समाज या जनमानसात एवढेच कार्य केले पाहिजे कि त्यांची घर गृहस्थी साधी व साधारण रुपात चालू असली पाहिजे, नाही तर समाजात असेही साधक आहेत कि जनमाणसाला लुटून धन कमावून पुण्य कमावण्यात मग्न आहेत. पण ते हे विसरलेले आहेत कि त्यांच्या पुण्य कमावण्यात हे धन आड येत आहे.  हा परमार्थ साधनात विघ्न आणतो आहे. असा लुटारू गोरख धंदा या नकली साधकांचा फार भरभराटीला येत आहे त्यास साधारण मानवाने बळी पडू नये.

मनुष्यास धन कमावणे हे योग्य आहे.पण धनाची लालसा वाईट आहे.जगात कोणतीही भोग विलासाची लालसा मनुष्यास बंधनात किंवा संकटात टाकते.तृष्णा असावी ती प्रभू दर्शनाची, भक्तीची, श्रद्धेची ती आपणाला त्रिविध तापातून मुक्त करते. पण ती भाग्यवंतानाच नशीब होते. जे लोक भोगाच्या तृष्णेला विषया प्रमाणे त्यागतात,जे जगात फक्त दिसण्यास रमणीय वाटणारे पदार्थ किंवा भोग त्याकडे नजर वळून सुद्धा बघत नाही. त्याच्याच अं:तकर्नात भव्न्ताचीच तृष्णा असते. त्याना मुढी लोक पागल समजतात. कुणी मूर्ख, तर कुणी आळशी समजतात.पण ते निन्द्कान कडे दुर्लक्षित राहतात. त्याना कुणाचीच पर्वा नसते. त्याना प्रभू शिवाय काहीच दिसत नाही.त्याच्या साठी ईश्वराला सुद्धा आपले आसन सोडून यावे लागते. त्यातच भक्तांचे जीवन शरद पोर्णिमे प्रमाणे अमृतमय प्रकाशाने भरभरून जाते. व धन, मान, कुल, विद्या, वर्ण, अभिमान सर्वकाही ईश्वर प्रेमाच्या धारेतून वाहून निघते,व मायामोहाचे लेन-देन तुटून मूक्त होतात. आणि त्यांच्या साठी परमेश्वराचे परमधामाचे दरवाजे मोकळे होतात. ईश्वराचे सुमधुर स्वर त्याच्या कानी पडतात.आणि दिसायला लागतात ते नुसतेच अपार विश्व परम पवित्र ”सोहम दर्शन” त्यातच ते तृप्त होतात. त्यांच्या साठी कोणतेही कार्य शेष राहात नाही! ‘तस्य कार्य न विद्यते।’

Source : Marathi Unlimited articles.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा