एक जिवंत संस्कार




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Ek jiwant sanskar, Read full articles about the ek jiwant sanskar. this articles teach you how to live the life. read full articles on child development.

ek jiwant sanskarएक जिवंत संस्कार – – –  नमस्कार, अभिवादन!
श्रेष्ठतम नमस्कार म्हणजे साष्टांग प्रणिपात पोटाच्याबळे भूमीवर दोन्ही हात समोर सरळ ठेऊन साष्टांग प्रणाम ह्यात मस्तक, भूमध्य, नाकाचे टोक, वक्ष, उर, घुटने, कर तळवे आणि पायाची बोटे हे आठ अवयव भूमीला स्पर्श करून नमस्कार होतो. तसेच स्म्मानियांना दोन्ही हाताच्या बोटांनी पायांना स्पर्श करून घुटन्यांच्या बळे बसून मस्तक आपल्या हातावर ठेवून नमस्कार केला जातो. हे पूर्ण स्वरूप होय. आणि पायांना दोन्ही हाता च्या बोटांनी स्पर्श करून तिच् बोटे आपल्या मस्तकाला स्पर्श केलेल्या नमस्काराला अर्धरूप मानतात. दोन हात जोडूनथोडे मस्तक झुकवून केलेल्या नमस्काराला सांकेतिक रूप म्हणतात. महर्षी व्याघ्र्पाद ऋषी म्हणतात कि एका हाताच्या स्पर्शाने कधीच नमस्कार करू नयेत, कारण आपली पूर्वीची पुण्याई निष्फळ होते. म्हणून डाव्या हाताने डाव्या पायांस व उजव्या हाताने उजव्या पायांस स्पर्श करून श्रद्धा-भक्तीनेच नमस्कार करावा.हा मानवाचा सर्वोच्च सात्विक संस्कार आहे. नमस्कार हा स्थूल-देहाला नसून अंतरात्मातील प्रतिष्ठीत नारायणाला असतो.आपण तर कराच पण आपल्या संतान-तसेच पुढील पिढीला हि हे संस्कार आवश्यक समजावा. गुरुजन, माता-पिता, जेष्ठ-श्रेष्ठ सर्वांना नमस्कार करण्याचे संस्कार ठेवा. तसेच सदाचार, शिष्टाचार हे सुद्धा त्याचेच मुख्य अंग आहेत,यात फक्त भौतिक लाभ नसून अध्यात्मिक व दिव्य लाभ प्राप्त होऊ शकतो. उदा पुरातन वृतांतात म्हणतात महर्षी मार्कंडेय ऋषींना ते पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडील मृकन्डू याना लक्षात आले कि त्यांच्या मुलाचे आयुष्य फक्त पाच वर्ष्याचेच आहेत; तेव्हा त्यांना चिंता झाली परंतु त्यांनी मुलाला (मार्कंदेयाला ) उपदेश दिला व म्हणाले वत्स! कुणीही जेष्ठ-श्रेष्ठ द्विजोत्तम दिसल्यास त्यांना विनय पूर्वक साष्टांग  प्रणिपात अवश्य करावा, मग काय तें आज्ञांकारी होतेच त्यांनी हे व्रत स्वीकारले हे त्यांच्या संस्कारातच होते. एकदिवस सप्तर्षी त्यांच्या समोरून जात असता त्यांनी ऋषींना विनम्र अभिवादन केले.तेव्हा ऋषींच्या मुखातून “दीर्घायुर्भव दीर्घायुर्भव” हाच आशीर्वाद त्याना प्राप्त झाला.आणि तें पाच वर्षाचे आयुष्य असणारे मार्कंडेय ऋषी कल्प कल्पांतक चिरंजीवी झाले. म्हणून म्हणतात आपल्यात अभिवादन संस्कार प्रतिष्ठीत झाला तर त्याचे पुण्यफलांने कर्तव्यकर्मकधीही लाभेल.
** बिना स्नान करून साधू संन्याशी याना स्पर्श करून नमस्कार करू नये. स्त्रीयांनी कुठल्याही पर पुरुष्याला स्पर्श करून नमस्कार करू नये. ( पिता व पती सोडून) दुरून नमस्कार करावा. तसेच स्मशान, कथास्थल,देव विग्रह समोर केवळ मानसिक नमस्कार करावा.
** वैज्ञांनिक म्हणतात आपल्या हात-पायांच्या बोटानं मधून निरंतर विद्युत किरणे निघत असतात. आणि मस्तक, कपाळ व बोटे यात विद्युत प्रभाव ग्रहण करण्याची शक्ती असते. म्हणून आपण आपल्या श्रेष्ठ व जेष्ठांच्या चरणावर मस्तक व बोटांनी स्पर्श करून ती शक्ती ग्रहण करू शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रणाम, अभिवाद्न, नमस्कार हि पद्धत शिष्टाचार म्हणून आहेच पण त्या व्यतिरिक्त वैज्ञांनिक,व अध्यात्मिकता हे हि आहे. भनवान शंकराने श्रिसती मातांना नमस्कारा विषयी  समजाविले सज्जनलोक परस्पर जो अभ्युस्थान,विनम्रता, व नमस्कार करतात. तो चित्तात स्थित ज्ञानस्वरूप परमपुरुषा साठी असतो. देहाला, देहातील अहंकाराला नाही.ज्याला नमस्कार केला जातो त्याने समजले पाहिजे कि हा नमस्कार अंतरात्म्यातील परमेश्वराला आहे माझ्या अहं किंवा देहाला नाही. जो कोणी भगवान नामाने नमस्कार करतो. जसे ”राम, राम”तर दुसर्यानेहि ”राम, राम” म्हणूनच प्रत्युत्तर दिले पाहिजे. आणि दुसर्या सांप्रदायातील लोकांना नमस्कार करताना त्याना त्यांच्या मर्यादित व्यवहारा , मर्यादा अनुरूप नमस्कार झाला पाहिजे.तेव्हा हा संस्कार-आपल्या जीवनात व वंशपरंपरेत  उतरवण्याचे प्रयत्न झालेच पाहिजे तेव्हा परस्पर प्रेम, आदरभाव निर्माण होईल.

sanskarनमस्कार किंवा अभिवादन हे भारतीय सनातन धर्म संस्कारातील शिष्टाचारातील महत्वाचे अंग आहे. ज्याने हे व्रत घेतले त्याच्या मध्ये नम्रता, विनय, शील श्रद्धा, सेवा, अनन्यता, तसेच शरणागती ई.  भाव आपोआपच प्रविष्ट होतात. याला उत्तम संस्कार म्हणतात. लहान आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करतात.  व बरोबरीची व्यक्ती एकमेकांना तोंडी नमस्कार म्हणतात, हात मिळवितात. आपल्या या संस्कृतीत लहान आणि महान याचा निर्णय त्य व्यक्तीच्या त्यागा वरून केलेला आहे व्यक्ती जेवढा त्यागी तेवढाच महान समजल्या जातो, उदाहरण म्हणजे शुकदेवांचे वडील व्यासांनी त्याना अभ्युस्थानांनी नमस्काराने सम्मानित केले होते. आणि त्यागा नंतर विद्या व वर्ण चा विचार केला जातो. आपल्या पेक्षा मोठी व्यक्ती समोर आल्यास दिसता क्षणी त्यांना सामोरे जाऊन नमस्कार केला पाहिजे त्यांनी आपल्या समोर येण्याची प्रतीक्षा करू नये.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा