Atithi Devo Bhavo., This article gives you information about how to take care of your atithi. guest party in home. guest are god for us.
जगात जितके धर्म -परंपरा प्रचलित आहेत त्यात हिंदू-धर्म सर्वात श्रेष्ठ व पुरातन आहे. या करीता याला ”सनातनधर्म” म्हटले आहे. याचे अनुयायी चार वर्णात विभक्त आहेत. भगवान श्रीकृष्ण यांनी स्व्य्न हे विभाजन केलेले म्हटले आहे. गुण कर्मांनुसार ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र हे होय.याच प्रकारे ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, आणि संन्यास हे चार प्रकारचे आश्रम शास्त्रात सांगितले गेले आहे. या गृहस्थाश्रम सर्वात मुळ महत्वाचे व श्रेष्ठ आहे, याची महिमा विशेष रूपाने वर्णिलेली आहे. म्हणतात कि मनीशी ऋषीने एक वेळी आपल्या विवेकी तराजूत एका पाड्यात तीन आश्रम व एका पाड्यात एकच गृहस्थाश्रम ठेवून बघितले असता गृहस्थाश्रमाचे पाड्डे भारी व श्रेष्ठ भरले, कारण यातच अभीलषित पदार्थ व मोक्ष हे सुलभ आहे. या महत्व पूर्ण गृहस्थाश्र्मात सृष्टीच्या प्रारंभापासून परिपाठ चालू आहे कि दारातकोणत्याही रूपाने आलेल्या अतिथी ची सेवा यथाशक्ती केली जाते. एखाद्या गृहथा जवळ काही जरी नसेल तरी त्या साठी शास्त्रात विधान सांगितलेले आहे कि” बसण्यास स्थान, आसन, पिण्यास पाणी, श्रद्धापूर्वक गोड, मधुर बोल याची कुठल्याही सज्जनाच्या गृहात कमतरता नाही”. गृहस्थाश्रमाचा धर्म आहे कि आपल्या घरात यथाशक्ती बनलेले भोजन, झोपणार्याला शय्या, थकल्या-भाग्लेल्याला आसन, तहानलेल्या पाणी, भुकेल्या अन्नअसे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यास प्रसन्न ठेवले पाहिजे, हे सनातन धर्मात सांगितलेले आहे. अतिथी सत्कार राजमहाला पासून तर भिक्षुकाच्या झोपडी पर्यंत यथाशक्ती सांगितलेले आहे.
Source : Marathi Unlimited.
1 Comment. Leave new
Dharm prachiti karita ha article khup mahatwacha ahe.
athithi cha pratham dharm.