उद्योगपती आणि राजकारणी यांच्यातील संबंध उघडकरणारे दोन ऑडिओ टेप टीम अरविंद केजरिवाल यांनी आज देशाच्या समोर आणले. त्यामुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचारावर नवा खुलासा आज ऑडिओ टेपच्या माध्यमातून पुढे आला. या देशाचं सरकार कुठलाही पक्ष चालवत नसून रिलायन्स उद्योग देशाचं सरकार चालवत आहे. रिलायन्स उद्योगाचं भलं करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राजकीय पक्ष हातात हात घालून उद्योगपती मुकेश अंबानी यांना मदत करीत आहेत. काँग्रेस हे मुकेश अंबानींचे दुकान झाले आहे. मुकेश अंबानींच्या इशाऱ्यावर देशातील सरकार चालत आहे. सरकारने रिलयान्सला १ लाख कोटींचा फायदा करून दिला आहे. गॅस दरवाढविण्यासाठी गॅस उत्पादन निम्म्यावर आणलं गेलं आहे आदी गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
Source : Marathi Unlimited.