Sponge Cake :
This is a simple sponge cake recipe – you can serve it plain sandwiched with jam. It is a very light and delicate cake that is so very versatile with an array of fillings and icings to chose from.
तयारी वेळ २० मिनिटे, ओव्हन तापमान ३७५ ० फ वेळ १५ ते २० मिनिट
साहित्य :- मैदा ११५ ग्राम, पिठी साखर ११५ ग्राम, लोणी १००ग्राम, अंडी २, बेकिंग पावडर १/२ चमचा व्हॉनिला इंसेंस १ टि स्पून, किंचित पाणी.
कृती :- मैदा व बेकिंग पावडर तीन वेळा चाळून घ्यावे आणि, लोणी व साखर एकत्र करून पांढरा रंग येईस्तोवर फेटावे, अंडी फेसून घ्यावीत, व ते थोडे थोडे करून साखरेच्या फेसलेल्या मिश्रणात घालून परत चांगले फेसावे.व्हॉनिला इंसेस घालावा. चाललेला मैदा या मिश्रणात घालून हलक्या हाताने एकत्र करावे व लागल्यास थोडे पाणी घालावे. तुपाचा हात लावलेल्या बेकिंग डिशमध्ये हे पीठ ओतून पूर्वीच गरम केलेल्या ओव्हन मध्ये बेक करावा.
Source : Marathi Unlimited.