काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी गुजरातमधील राजकोट सभेवेळी कोळसा हल्ल्याला तोंड द्यावे लागले. एका तरूणांने सोनियांच्या दिशेने कोळसा भिरकावला. सोनिया दिल्लीत परतल्यानंतर एका तरुणाला झालेल्या अटकेनंतर कोळसाफेकीची बाब उजेडात आली. लोकांना दिलेला शब्द पाळत नाहीत. त्यांच्या या वर्तनाच्या संतापातून आपण सोनिया गांधींवर कोळसा आणि राख भरलेली थैली फेकली, असे त्रिवेदी याने पोलिसांना सांगितले. आपण हळदीची राख करून पिशवीत भरली होती, असेही तो म्हणाला.
Source : Marathi Unlimited