Sidha Purushacha Nirnay, If you want to read Marathi articles then must visit Marathi unlimited. the ultimate source of Marathi articles. get the latest Marathi articles for free download.
सिद्ध पुरुषाची भूमिका महाकारण देह अभिमानी आहे. साधकास सोहम ज्योतिरब्रम्हाचा अनुभव आल्यानंतर श्री सद्गुरू त्याची सिद्धावस्था तयार करतात. मी सोहम ज्योतिर्मय, निराकार, स्वयं प्रकाशित आहे. मज पासूनच आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी झाली. अश्या ‘अपरोक्ष’ ज्ञानास सिद्धपुरुष म्हणतात. याचा ‘महाकारण देह’ अभिमानी आहे.
सिद्धांत पुरुषांचा निर्णय.
सिद्धांत पुरुषाची भूमिका अतिकारण देह अभिमानी आहे. मी पृथ्वी नव्हे, मी पाणी नव्हे, मी वायू नव्हे, मी अविनाश, अजन्म, अजरामर, अनादी सनातन सोहमज्योतिर्मय निराकार आहे. असे आकाशात आभाळ (अभ्र) तयार होते आणि लयास जाते परंतु आकाश जागच्या जागी तसेच कायम असते, त्य प्रमाणे मी निराकार आहे. मज माजी आकारी पंचभूते आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी, स्थावर जंगम हा सर्व आकार लयास जातो. परंतु मी सोहमज्योतिर्मय निराकार जसाच्या तसाच कायम राहतो मी एकता सर्व मिळून एकाकार विदेही आहे, यालाच “एकं ब्रम्ह द्वितीयं नास्ति”(नाही) असे म्हणतात या जाणीव अवस्थेला आत्मज्ञानी, ब्रम्ह् ज्ञानी, ब्रम्हवेत्ता ‘सिद्धांत पुरुष’ म्हणतात.याचा ”अतिकारदेह उर्फ कैवल्यदेह” अभिमानी आहे.
Source : Marathi Unlimited