वदनी कवळ घेता ! लक्षात घ्या




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

food for healthजेवण हि एक शारीरिक गरज असली तरी तो एक भावनिक संस्कार देखील आहे. आपल्या संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रम्ह मानले जाते. सकस,पोषक आणि चौरस असा वेळेवर मिळणारा आहार शरीराची गरज तर भागवतोच; पण मानसिक सामाधानही देतो. जेवणाच्या वेळेचे वातावरण मुलांच्या भावनिक विकासासाठी फार आवश्यक असते. जेवणाच्या वेळी एकत्र आल्या मुळे, आई-वडील आणि ईतर कुटुंबीय यांच्या सोबत मुलांना संवाद साधण्याची संधी मिळते. कुटुंबियान मध्ये विचारांचे आदान-प्रदान होते. अश्या प्रकारे कौटुंबिक जिव्हाळा जपत पार पाडणारे-जेवण समाधान देते आणि कुटुंबियांचे एकमेकांशी असलेले प्रेमाचे, विश्वासाचे नाते दृड देखील करते. सर्वांनी एकत्र बसून सर्वांना (एकमेकांना) वाढून, वाटून घेण्यात वेगळाच आनंद असतो. या उलट प्रतिकूल परीस्थितीतील मुलांच्या रोजच्या जेवनाचा प्रश्न असतो.त्यांच्या मनात सातत्याने खायला मिळेल काय, अश्या शंका असतात. त्याचा अप्रत्यक्षपणे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे अशी मुले उदास आणि रागीट बनतात. म्हणूनच जेवणाला फक्त शारीरिक गरज न समजता संस्कारित पूर्णब्रम्हच मानले पाहिजेत.

मिठाचे फाजील लाड नको !

रोजच्या आहारात मिठाला महत्वाचे स्थान आहे. मिठाअभावी अन्न पदार्थ बेचव किंवा अळणी लागतात; परंतु अन्नाला चव आणणारा मीठ हा जेवणातील एक घटक नाही. हे बर्याच जणांना माहित नसते; त्यामुळे मिठाचा जास्त वापर होऊन तो शरीराला हानी कारक होऊ शकते. प्रौढ व्यक्तीला सर्व साधारणपणे अर्धा ग्रंम मीठ पुरते; परंतु रोज जेवणात दहा ते पंधरा ग्रंम मिठाचा वापर होतो. मिठाचा जादा प्रमाणातील वापरमाणसाची पचनक्रिया बिघडविन्यास कारणीभूत ठरतो. मिठाच्या अति वापरामुळे.मुत्र पिंडावर अधिक ताण पडतो. मिठाचा अगदी कमी वापर करणार्या व्यक्ती रक्तदाब व हृद्य विकारापासून दूर राहतात. अमेरिकन कर्करोग तज्ञांच्या मते खारे पदार्थ जास्त खाणार्यांना पोटाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , , , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu