सचिन म्हणतोय : शिक्षणात स्पोर्टस आणा
आपण मास्टर – ब्लास्टर ला तर चांगलेच ओळखतो , आपला लाडका सचिन म्हणतोय कि शिक्षणात स्पोर्टस आणा. जर मुलांना यशस्वी वयाचा असेल तर स्पोर्ट हे आजच्या काळात फार गरजेचे झाले आहे. स्पोर्ट मुलाच्या जीवनाचा पाया मजबूत करतो. राजसभा सदस्य सचिन तेंडुलकरच्या सूचनेवर सरकारने गांभीर्याने विचार करण्याचे ठरविले आहे . या संदर्भात योग्य तो अभ्यास , चर्चा करून निर्णय घेण्यात येईल , असे केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिबल यांनी सांगितले आहे . सचिनने तयार केलेले प्रेझेंटेशन बघू , मग ते सीबीएसई व एनसीईआरटीकडे पाठवू . त्यांनाही सचिनचा प्रस्ताव पसंत पडल्यास पुढे विचार होईल ‘, असे सिबल यांनी स्पष्ट केले . प्रस्ताव आता सेन्ट्रल कमिटी बघेत आणि त्या नुसार निर्णय घेयील. सचिनची हि मागणी फार मोलाची आहे आज अभ्यासाबरोबर स्पोर्ट हे फार गरजेचे झाले आहे. आपण आपल्या पाल्याला स्पोर्ट या करियर मध्ये सुधा घालू शकता . मास्टर – ब्लास्टरने असे एक लिखित पत्र सरकारला पाठविले सुधा होते.
Source : Marathi Unlimited Blog.