सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या वादग्रस्त मालमत्तांवरून वादंग माजला असतानाच , हरयाणातील जमीन व्यवहारावरूनही ते अडचणीत आले आहेत . वढेरांची कंपनी आणि डीएलएफ यांच्यातील ५८ कोटींच्या जमीन व्यवहाराची चौकशी सुरू करणाऱ्या अशोक खेमका या आयएएस अधिकाऱ्याची हरयाणा सरकारने तडकाफडकी बदली केली असून या कारवाईला बळी न पडता खेमका यांनी हा व्यवहारच रद्द करून हरयाणा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत .
१९९१च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या अशोक खेमका यांच्या बदलीची ही ४३वी वेळ आहे . परंतु , यावेळची त्यांची बदली मोठे राजकीय नाट्य घडवणारी ठरली आहे . खेमका यांनी हा प्रकार राज्याच्या मुख्य सचिवांना पत्रद्वारे कळवला व ‘ दर महिन्याला बदल्या करण्याच्या ‘ धमक्या येत असल्याची तक्रार केली . खेमका यांना हरयाणा सरकारने बियाणे विकास महामंडळात एमडीपदावर पाठवले असून तेथे त्यांना १२ वर्षे ज्युनिअर अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करावे लागणार आहे .
Source : Marathi Unlimited.
Read latest News about Robert Wadera and Soniya Gandhi Only On Marathi Unlimited. Get latest and Fastest News Updates.
3 Comments. Leave new
Robert vdera is the great man… great tip on business.
Robert wodera is very great man…
Great Robert….