मुंबई : पेट्रोल आणि डिझेलविक्रीचे कमिशन वाढवण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील पेट्रोलपंपधारक आज , सोमवारपासून आठच तास पंप सुरू ठेवणार असून , त्यामुळे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेतच ग्राहकांना पेट्रोल , डिझेल उपलब्ध होऊ शकेल . पेट्रोल आणि डिझेलविक्रीचे कमिशन वाढवण्यासाठी आज , सोमवारपासून केवळ आठ तास काम सुरू ठेवण्याचे हत्यार पेट्रोलपंपधारकांनी बाहेर काढल्याने सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे . कमिशनवाढीची मागणी मान्य झाल्यास डिझेलच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसू शकेल . सध्या देशभरात प्रतिलिटर पेट्रोलसाठी १ . ५ रुपये , तर प्रतिलिटर डिझेलसाठी ९१ पैसे कमिशन कंपन्यांकडून दिले जाते . या कमिशनमध्ये पेट्रोलसाठी ४८ , पैसे तसेच डिझेलसाठी २५ पैसे वाढ देण्याचा प्रस्ताव सध्या पडून आहे.
Source : Marathi Unlimited.
From today petrol pump will remain open for 9 am to 5 pm. all users must have to full there petrol tanks in between the allotted timing slots, otherwise you will not get petrol.