गडकरीचे सडेतोड उत्तर

Like Like Love Haha Wow Sad Angry भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. पण केजरीवाल यांनी...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

kejriwal and gadkariभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. पण केजरीवाल यांनी तब्बल दीड तास केलेल्या आरोपांना अवघ्या वीस मिनिटांत गडकरी यांनी सडेतोड उत्तर दिले. किंबहुना स्वत: गडकरी तसेच सुषमा स्वराज व अरूण जेटली या विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या आक्रमक युक्तीवादामुळे इंडिया अगेन्स्ट करप्शनचा आजचा गौप्यस्फोट स्फोटक ठरण्याऐवजी फुसका बार ठरला. अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर केलेल्या गंभीर आरोपांना नितीन गडकरी यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आहे. आपण अशा चिल्लर आरोपांना महत्व देत नाही असं सांगत नितीन गडकरी यांनी आपल्यावरील आरोप झटकायचा प्रयत्न केला आहे. टीम केजरीवाल यांचे आरोप म्हणजे भाजपाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं गडकरी म्हणाले आहेत. मी मिळवलेली जमीन नियमानुसार मिळवली असून शेतकरी आणि मजुरांच्या हितासाठीच मी काम करत असल्याचं गडकरी म्हणाले.  केजरीवाल स्वताच्या स्वार्थ करिता दुसर्यांना बदनाम करीत आहेत असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.  केजरीवाल स्वताच राजकीय पक्षाची थापणा करत आहे हे सर्वांनाच माहिती आहे.

Source: Marathi Unlimited.

Read Full news updates on Nitin Gadkari and Kejriwal Only on Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories