चौर्यंशी लक्ष योनीतील सर्व श्रेष्ठ ”नरदेह”
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Nardeh Vishesh, Dehache Falit, Human body the most biggest gift of the world has given to us from god. this article contain the how our body and good and bad for us.

sarvat shresta nardehचौर्यंशी लक्ष योनीतील सर्व श्रेष्ठ ”नरदेह”

 पंच भुते व तीन गुण मिळून अष्टधा प्रकृतीच्या योगे अंडजजारजादि  चतुर्विध ल्खानीचे अनंतावधी देह आहेत. त्या सर्वात आपला हा औट  हाताचा नरदेह फार श्रेष्ठ आहे. पण हा देह आपला नसून काळाचा  आहे. त्याची आपली काही कालच संगती आहे. सर्व जीव सोहं  ब्रम्हानंदाला विसरून विषयानंदाच्या नदी लाःल्या मुळे विषयी  बनले.देह मर्त्य असल्यामुळे जीर्ण वस्त्रा प्रमाणे जीव हा देहांतर  करीत असता.
”नाना योनीगत:पश्चात प्राणते नर जन्म हि” असा हा नरदेह  आपल्याला लाभला आहे. विषय वासने ने देह आणि देहामुळे विषय  वासना, अश्या भव चक्रात पडून सर्व जीव “पुनरपि जननं,पुनरपि  मरनम”, चे गोतें खात आहे. हरनाच्या नाभी तील कस्तुरी प्रमाणे  नर-नारीच्या अंत:करण गुहेत सोहं परमात्मा आहे. त्याचे ज्ञान  सुदैवाणे उब्दोधीत होईल, तर नर-नारी जन्म-मरणातून मुक्त होतील. म्हणून नरदेह हि परमार्थाला एक कामधेनु किंवा कल्पतरुच आहे! * सोहं परमात्म्याचे दर्शन घेण्या योग्य ज्ञान-बुद्धीचा डोळा फक्त मानव देहालाच आहे. तद्वरा- जे दर्शनाणे मुक्त होऊ ईच्छित नाहीतं, ते मानव दुर्दैविच होत! व जे मानव सोहंप्रभूला जाणतात ते दैववान भाग्यवान व भाग्यशाली होतं.

नरदेहाचा भाग्योदय!

भाग्योदय म्हणजे सुखाची प्राप्ती, जगातील सर्वच प्राणी मात्रांची अहोरात्र सुखाकडे प्रवृत्ती आहे. धनांशिवाय पोटोबा नाही,व पोटोबाशिवाय विठोबा कदापि तृप्त व प्रसंन्न होणार नाही.म्हणून सुखाचे मुळ ”धन” हेच सर्वांचे मुख्य जीवन-जीवनसत्व आहे. * अन्नमय प्राण व प्राणमय शरीर. *अन्न हे धनाशिवाय मिळणे शक्य नाही. जसे अन्न तारक व मारक आहे तसेंच धन सुद्धा तारक व मारक आहे. मनुष्य धनाचा जसा दुरुपयोग व सदउपयोग करतो,तसे तें धन मनुष्याला तारक किंवा मारक निश्चित बनते.असा नियम आहे. * धनानेच परोपकार व परमार्थ होतो.* तसेंच पैसा हा अनर्थाला आणि परमार्थाला कारणीभूत आहे. थोर त्यागी पुरुष्याला लंगोटीची आवश्यकता असते.ती लंगोटी पैश्याशिवाय कोण देणार? परोपकाराच्या, परमार्थाच्या सर्व साधनात ”धनाचे” स्थान उच्च आहे. * धनाने अन्नदान, वस्त्रदान, जीवदान, विद्यादान ईत्यादी धर्माची आणि मोक्षाची प्राप्ती होते. धनाला दोष देण्याएवजी अविचारी, अनैतिक मनोवृत्तीलाच सर्वस्वी दोष देणे योग्य आहे. ** सोहं घ्यान चिंतनीय,स्त्री-पुरुष कदापीही निर्धन राहू शकत नाही. कारण सदासर्वदा ”देहाभिमानशून्य” व आत्मवृत्तीने परम वैभवशाली असतात.”अंतरी वसतां नारायणे | मग लक्ष्मीस काय उणे | ज्याची लक्ष्मी आपणे | बळकट धरावा || विष्णूची भूमिका बनविली कि स्वत:च्या पद्छांये प्रमाणे लक्ष्मी तुमच्या मागे आपोआपच येईल. लक्ष्मीच्या मागे लागण्याचे काहीच कारण नाही. जो आत्मस्वरूप सोहं स्वरूप  ‘विष्णू” च्या मागे लागतो. त्याच्या मागे लक्ष्मी आपोआपच चालून येते. असा प्रत्यक्शानुभव आहे. सोहं नाम हे अद्वितीय वैभवशाली बीज नाम आहे. सोहं नामाचे चांगले नीजध्यास पूर्वक चिंतन करा.अन मग पहा लक्ष्मी चा काय तो चमत्कार जे लोक केवळ लक्ष्मीच्या च मागे लागतात. लक्ष्मीपती भगवान त्याचा अतिशीघ्र उच्छेद- नाश करतो! कारण दुसर्यांच्या एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष भगवंताच्या -पत्नीवर लक्ष ठेवणारा केव्हाही” कपाळ-मोक्ष” होणार हे ठरलेले आहे. जे लक्ष्मीचे पतींची म्हणजे सोहं प्रभू ची आराधना करतात, त्यांच्या वर लक्ष्मी नेहमीच कृपा करते,म्हणजे- लक्ष्मी त्यांचे जवळ अखंड सिद्धी सहित वास करते. ||ओळखीला हरी धन्य तो संसारी | मोक्ष त्यांचे घरी सिद्धी सहित || ** जे सोहं प्रभूला विसरतात.ते पतित व दुर्भागी. होतात. लक्ष्मीला तारक-मारक-उद्धारक बनविणे हे सर्वस्वी स्वत:चे स्वाधीन आहे. *धनाशिवाय लक्ष्मी शिवाय एक क्षणभर देखील जगात सहसा कोणाचेही कदाचित मुळीच चालू शकत नाही. कारण संपूर्ण जीवनोपयोगी वस्तूंचे ‘मुळ’ धनच आहे. धनात जीवन-मरणाचे पूर्ण सामर्थ्य आहे. धन हेच जीवन व निर्धन हेच मरण हे सत्य आहे. भिकार्या पासून तर चक्रवर्ती पर्यंत जपी, तपी, मुनी, ध्यानी, ज्ञानी, अनुष्ठानी, साधू-संत, महंत, यच्चयावत सर्वच लक्ष्मीचे याचक व उपासक बनलेले व पैशासाठी हात पसरलेले सदैव दिसून येतात.

नरदेहाचे ”दुर्दैव”

दालीद्र्या सारखे महाभयंकर अत्युग्र व असह्य दु:ख जगात कोणतेच नाही. ”दालीद्र्य व मरण ” या दोहीत मरणच अधिक बरे वाटते.पण दालीद्र्य बिलकुल रुचत नाही. सहन होत नाही! कारण मरणाचे कष्ट क्षणभरच असतात, परंतु दालीद्र्याचे कष्ट मात्र सर्व आयुष्यभर सतत पदोपदी व क्षणोक्षणी असह्य होत असतात. व जीवनाला अंतर-बाह्य एक सारखे होरपडून काढीत असतात. सर्व चिंतान मध्ये दालीद्र्याची चिंता अत्यंत भयानक विलक्षण दाहक व संहारक आहे. सजीवांना ”चिंता”जाळीत असते.आणि निर्जीवान्ना ”चिता” जाळीत असते. चीताव चिंता यात बिंदू च्या विशेष प्रभावामुळे चिंते मध्ये चिते पेक्षाहीविशेषच भयंकरता ‘डोक्यावरील’ वाटोळा बिंदू हा जीवनातील सर्व सुख शांती समाधानाचे (समूळ) वाटोळे करणारा एक प्रकारे धोक्याचा दिवा समजण्यास मुळीच हरकत नाशी, चिंता म्हणजे काळजी, स्वयं ‘काळजी हा शब्दच मुळी मूर्तीमंत ‘जी-काळ’ च या अर्थाचा स्पष्ट दर्शक व सूचक आहे. दालीद्र्याच्या काळजीने काळीज अजिबात करपून व होळपून जाते. मनुष्य भर तारुण्यातच पार खंगुण जातो.म्हातारा होतो व अकाली मृत्यू पावतो. दालीद्र्यामुळे अंगावर फटके-तुटके, मळके कपडे घालने भाग पडते, त्यामुळे मोठी लाज होते. लज्जेमुळे मनुष्याचे तेज नष्ट होते, चेहरा काळा पडतो. तो हीन, दिन-व निस्तेज बनतो. व त्याचा सर्वत्र अपमान होतो. अपमाना मुले त्याला दु:ख व शोक होतो. आणि त्यामुळे बुद्धी नष्ट होते. दालीद्र्यात सर्वच संकटे व आपत्ती वास करतात. ज्या घरात दालीद्र्य वास करते.तेथे सदैव सर्व गोष्टींचा अभाव, उणीव, अडचणी, आजार, अशांतता, उदासीनता, संताप, निष्ठुरता, प्रेमशून्यता, धुसफूस, कुरबुर, अबोला संशी, कप्त, विश्वासघात, भांडण-तंटे, दोषारोप, मारहाण रडारड, शिव्या-शाप, फसवणूक, घातपात. ईत्यादी अमंगल व निंद प्रकार सर्रास दिसून येतात. मनुष्यातील सगुण लोपतात. नितीमत्ता बिघडते. माणुसकी जाते, कर्तबगारी लय पावते,बुद्धी मारली जाते.काहीच सुचत नाही, अनितीकडे पापाकडे प्रवृत्ती होते, शेवटी नाश होतो. शहाणा असूनही वेडापिसा बनून निरुपायाने आत्महत्याही करून बसतो.थोर मनाच्या श्रिमंतांनी या सामान्य जनातील निराधार गरिबांना ‘द्लीद्री नारायणांना’ पोटभर जेऊ धाल्ने म्हणजे ”सहस्त्रयज्ञ” करण्याचे किंवा” सहस्त्र भोजन” महतपुण्य संपादन करणे होय.तुमच्या दारात येणार्या प्रत्येक ही न-दिन भिकार्याला नारायण स्वरूप समजून स्वत:च्या घासातला घास काढून पूर्ण श्र्ध्येने नित्य देत चला. देणे वाल्याला अन्नदान सर्वात मोठा दान आहे.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu