आकर्षक डोळे सौंदर्य खुलवितात. निस्तेज डोळ्यांमुळे सौंदर्यात बाधा येते. डोळ्या भोवतालची काळी वर्तुळे डोळ्याचे सौंदर्य कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. डोळ्या भोवतालची त्वचा अधिक नाजूक असल्याने तिची काळजी घ्यायला हवी.त्यासाठी * तुरीच्या डाळीत हळकुंडाचा तुकडा घालुन ते पाण्यात उगळावे. हा लेप डोळ्याखाली लावावा. तसेच जायफळ उगाळून तो लेप सुद्धा डोळ्याखाली लावावा. जास्त वेळ सुकू देऊ नये. लवकरच घुवावे. काकडी चा व लिंबाचा रस एकत्रित करून लावावा. तर डोळ्या भोवतालची त्वचा उजळते. एरंडेल तेल, खोबरेल तेल, साय किवां लोणी डोळ्या खाली छोडा वेळ लाऊन ठेवावे. व वीस मिनिटांनी धुवावे. झोपण्या पूर्वी कुठल्याही प्रकारचा मेकअप डोळ्या भोवताली ठेऊ नये. काढूनच झोपावे, तसेच कोणताही फेसपॉक डोळ्या भोवताली जास्त वेळ लाऊ नये. अश्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास डोळ्याचे सोंदर्य खुलेल.
Source : Marathi Unlimited.
This article is based on taking care of the eyes. if you are computer users then you must need to take care of the your eyes. Marathi unlimited is the source of health tips and articles. stay with us for more information on Healthy Eyes.