मनात विचार आणले कि आपण काहीही करू शकतो. माणसाच्या साहसाला काही सीमा नाही.. रेडबुल स्ट्रॅटोस असे सिद्ध करून दाखवले आहे. रेडबुल स्ट्रॅटोस नावाच्या मिशनद्वारे फेलिक्स या धाडसी स्काय डायव्हरने एक लाख २८ हजार फुटांवरून (सुमारे ३९ किलोमीटर) जमिनीकडे झेपावून विश्वविक्रम रचला. या उंचीवर पोहोचण्यासाठी हेलियम बलूनला जोडलेल्या , अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशा कॅप्सुलचा (कुपी) वापर करण्यात आला. फेलिक्सने बलूनच्या साह्याने न्यू मेक्सिको येथून वातावरणाच्या वरच्या थरांत पोहोचण्यासाठी उड्डाण केले. दोन तास ३६ मिनिटांनी एक लाख २८ हजार फुटांवर पोहोचल्यावर वातावरण आणि अवकाशाच्या सीमेवरून त्याने जमिनीकडे झेप घेतली. मूळचा ऑस्ट्रियाचा असणारा फेलिक्स हा अशाच प्रकारच्या धाडसी डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत जगातील अनेक उंच इमारतींवरून उड्या मारण्याचे विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत. मात्र , रविवारी त्याने वातावरण आणि अवकाशाच्या सीमेवरून घेतलेली झेप ही ऐतिहासिक ठरली. माणसाच्या इतिहासातील सर्वांत उंच ठिकाणावरून झेप घेऊन (फ्री-फॉल) फेलिक्स बौमगार्टनर याने रविवारी इतिहास रचला.
Source : Marathi Unlimited.
1 Comment. Leave new
sad news for bollywood…………….