गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज रणशिंग फुंकलंय . नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात… राजकोटमध्ये जाऊन सोनियांनी प्रचारसभेत भाजपवपर जोरदार टीका केलीय. नरेंद्र मोदींनी केलेल्या परदेशी दौऱ्यांच्या खर्चाच्या आरोपांना त्यांनी उत्तर देणं मात्र त्यांनी मोठ्या शिताफीनं टाळलंय. एनडीएच्या तुलनेत यूपीए सरकारनं गुजरातला ५० टक्के जास्त निधी दिल्याचा दावाही त्यांनी केला. गुजरातचा विकास हा राज्यातल्या जनतेच्या मेहनतीनं झाल्याचं सांगत त्यांनी नरेंद्र मोदींच्या ‘विकास पुरूष’च्या बिरूदावलीलाच आव्हान दिलंय.
Source : Marathi News