Women’s and Jewellery Importance, women’s and jewellery related. many women’s like costly jewellery and they are just crazy about it. this articles give the importance of jewellery.
महिलांना सोन्याचे दागिने म्हटले कि अगदी उतावीळपणे, किती घालावे आणि किती नाही असे वाटायला लागते. पण आज त्याच्या भावं दराने उच्चांक गाठलेला आहे तेव्हा सामान्य माणसाला त्याचा विचार करणे देखील कठीण झालेले आहे. त्यातूनच या काळात सामान्य मनुष्याला त्याची पारख करता येत नसल्याने सोने विक्रेत्यांची चांगलीच चंगळ आहे. सामान्य मनुष्य त्याची क्वालिटी पारख ण्याच्या खोलपर्यंत जावू शकत नसल्याने त्यात विक्रेते त्याचा म्हणजे सोन्याचा व खरीद दारांचा भूलभुलैया करण्यात तरबेज होत चाललेले आहेत. ते कुठल्या प्रकारे फसवणूक [गाळतील] करतील याचे संशोधन सामान्य मनुष्य करू शकत नाही. तेव्हा या सोन्याच्या वाटेला जाने म्हणजे मूर्खपणाच म्हणावा लागेलसोन्याचे महत्व कुठे आणि काय ते पाहू !तसे पाहता भारतात सोन्याच्या खाणी कोलारच्या प्रसिद्ध आहेत, स्वतंत्र पूर्व काळात भारतातील बरेच सोने ब्रीटीशांनी भारता बाहेर नेलेत. १८८० साली ब्रिटीश आमदानीत जॉन टेलर्स & सन्स नावाच्या कंपनीने कोलारच्या खाणीतून सोने काढण्याचे काम हाती घेतले होते त्यावेळी १९५६ पर्यंतच्या काळात संपूर्ण खाणी जवळ जवळ साफच केलेल्या होत्या, सोन्याचे वैशिष्ठ्य असे कि एक ग्रॅम सोन्यापासून जवळ जवळ साडेतीन किलो मीटर लांबीची बारीक तार तयार होऊ शकते, तर ०.०००२ मिली मीटर ईतक्या पातळ चकती पिटू शकतात,एवढा लवचीकपणा त्यात असतो. सोन्याचे कॉरेट म्हणजे काय?
सोन्याची शुद्धता क्यरेटमध्ये मोजतात. २४ कॉरेट सोने म्हणजे शुद्ध सोने होय.काही दागिने बनविण्यात मिश्र धातूंचा उपयोग केला जातो. त्यासाठी सोन्यात चांदी, तांबे, निकेल, जस्त ई. धातू मिसळतात. त्यामुळे सोन्याची शुद्धता कमी होते.२२ क्यारेट सोन्या पासून बरेच दागिने तयार करतात, काही काळापूर्वी ब्रिटन या देशात ९ क्यारेट व अमेरिका या देशात १४ क्यारेट असे दागिने बनविण्यात येत असत पण आता तिकडील कार्य कुशलता बघून भारतातही प्रथम दक्षिण भागात व बंगाल प्रांतात अशा प्रकारे दागिने बनविण्याची प्रथा सुरु झाली होती. पण अलीकडे सर्वत्र असेच दागिने बनविण्यात येत असल्या कारणाने
दागिन्यांची शुद्धता कळायलाच येत नाही.जगातील एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी ७५% सोने दागिने बनविण्यासाठी वापरले जाते, १० ते १५ % ईलेकट्रानिक कारखान्यात वापरले जाते. सोन्याच्या पातळ पत्र्यातून ९८% ईनफ्रारेड किरणे प्ररावर्तीत होतात. त्यामुळे त्याचा उपयोग अंतराळवीरांचे पोशाख व उपग्रहांच्या जडणघडणित केला जातो. त्यामुळे उपग्रहातील तापमानावर नियंत्रण राहते,सोन्याच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा [रेयीडोआयसोटोपस] उपयोग वैद्यकात रोगावरील उपचारासाठी केला जातो. औषधातहि सोन्याचा उपयोग होतो.सोने आणि अर्थ व्यवस्था
आपली अर्थ व्यवस्था सुवर्णांधारीत आहे.वर्षा काठी भारतात खाणीतून २ टना पर्यंत सोने मिळते.मात्र भारतात सोन्याचा खप जास्त आहे.केंद्र सरकारच्या मुक्त आर्थिक धोरणामुळे बर्याच वर्षा पुर्व्री पासून सोन्याची मागणी लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. जागतिक सोने परिषदेच्या अंदाजा प्रमाणे आशिया खंडात भारत सर्वात मोठा ग्राहक बनत चालला आहे. सध्याच्याअंदाजा वरून भारतात दरवर्षी ५०० टना च्या वरूनच सोनेखरेदी केले जाते. त्यामुळे दरवर्षी सोन्याच्या साठ्यात वाढ होत आहे.आजच्या या घडीला भारतीयांपाशी सोन्याचा साठा भरपूर प्रमाणात आहे. त्याची किंमतही अब्जांत आहे. तरीच आजही हि भूमी सुवर्ण भूमीच आहे, असे म्हणावे लागेल.Source : Marathi Unlimited Articles.