गृहिणींना कानमंत्र
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Tips for Housewife’s. here are few tips for all women who live in home. kitchen tips, cooking tips, beauty tips etc.

gruhininna kanmantra , home tips*चहाची पावडर पाण्यात टाकून काही काळ उकळावी. हे पानी गाळावे. त्यात कापसाचा बोळा भिजवून लाकडी फर्निचर किंवा काचा स्वच्छ कराव्या. या पाण्याने डाग निघून जातील, आणि वस्तूंना चमक येईल.

* लाकडी कपाट टेबल यांना वाळवी लागली असेल तर तेथे पाणी लावावे आणि दुसर्या दिवशी ओल्या कापडाने साफ करून थोडे फ़िनाईल थेंब सोडावे बरेच दिवस पर्यंत वाळवी येत नाही.

* लिंब जास्त दिवस ताजे राहण्या साठी त्यावर खोबरेल तेलाचा थर देऊन फ्रीज मध्ये ठेवावे.

* लिंबाची साले वळवून ठेवावेत . ते वाळवलेली साले कपटा मध्ये ठेवल्यास झुरळे वै. होत नाही.

* शिजवलेले पूर्ण पातळ झाले असल्यास त्यात किंचित खाण्याचा सोडा घालून पुन्हा परतावे म्हणजे परत घट्ट गोळा होईल.

* डोसा कुरकुरीत होण्या साठी डाळ भिजत घालताना त्यात थोडी तुरीची डाळ, पाव चमचा मेथी दाणे सुद्धा भिजत घालावे.

* लाल भोपळ्याच्या बियां मधील मगज काढून त्याचे पीठ साजूक तुपात भाजून त्याच्या छोट्या गोळ्या करून नियमित खाव्यात शक्तीवर्धक असतात.

* उकाड्याचा खूप त्रास होत असल्यास चिंचेच्या पातळ कोळात साखर घालून ते पाणी प्यावे.

* जॅम वै, बनवताना संपूर्ण भांड्याला आतून लोणी लावावे. म्हणजे करपण्याची भीती राहत नाही.

* भजी बनवताना त्यात भिजवलेला साबुदाणा कुस्करून घालावा. भजी चांगली होतात.

* पालेभाज्या शिजविताना त्यात चिमुटभर खाण्याचा सोडा घालावा { सुरवातीलाच } भाजी शिजल्यावरही हिरवीच राहणार.

* सूप किंवा आमटी खारट झाल्यास त्यात उकडलेले बटाटे [ एक किंवा दोन ] मऊ करून घालावे खारटपणा कमी होतो.

* कडू निंबाची पाने सावलीत चांगली वाळवून लोकरीच्या [उणी ] कपड्यांत ठेवल्यास किडे वै. होत नाहीत.

* घरातील कचर्याच्या टोपलीत लिंबाची साले ठेवल्यास कचर्यात दुर्गंधी होत नाही.

Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d