पायांच्या थकत्यासाठी
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत एका जागेवर उभारल्याने पायाला थकवा जाणवू लागतो. या परिस्थितीत घरगुती उपायांनी सुधा आराम मिळू शकतो. एखादे वेळी पायाचे दुखणे वाढून ते गुढग्यापर्यंत पोहचते आणि ते गुढगे दुखू लागतात. अशा वेळी एक टेबल घेवून एक पाय जमिनीवर आणि दुसरा टेबलावर सरळ ठेवावा. पाठीत थोड वाकून आपल्या हाताने टेबलावरील पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. हि क्रिया पाच सेकंदान पर्यंत करावी. त्यानंतर पायाची अदला बदल करावी, आपले हात पायाच्या अंगठ्या पर्यंत फाचले नाहीत, तरी ते शक्य तेवढे लांबवावेत. पायांना मियामितपणे मालिश केल्यानेही पायांचा थकवा दूर होतो. मात्र मालिश करतांना चागल्या प्रकारचे कोल्ड क्रीम किंवा खोबरे तेल चा वापर करावा. मालिश मुळे रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होवून स्नायूंना आराम मिळतो. पायांना तेलाचा वापर करावा. मालीश् मुळे रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होवून स्नायूंना आराम मिळतो. पायांना अथवा पायांच्या बोटांना सूज आली असेल तर कोमात पाण्यात थोडे मीठ टाकावे. त्या पाण्यात सुमारे दहा मिनटे पाय ठेवावेत. पायांची सूज आणि थकवा दोन्ही कमी होतात. पायांना थकवा जनुवू नये म्हणून खूप कडक किंवा उंच टाचांची स्यांदल वापरणे टाळावे.
Source : Marathi Unlimited Health Tips