‘शूट आउट एट वडाला’ या आगामी सिनेमात सनी लिऑन आयटम नंबर सादर करणार अशी बातमी चर्चेत आहे. प्रियंका चोप्राही तिच्या चाहत्यांना या सिनेमात आयटम साँग करताना पाहायला मिळणार आहे. रागिनी एमएमएस-२ या एकता कपूरच्या आगामी चित्रपटात सनी लिऑन झळकणार आहे. एकता सोबतचा हा तिचा पहिला सिनेमा. जिस्म-२ हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला असला तरी सनीच्या बोल्ड सीनची मात्र चांगलीच चर्चा होती. तिच्या अपकमिंग आयटम साँग आणि एकताच्या चित्रपटात सनी प्रेक्षकांना कशी आकर्षित करेल ते भविष्यात समजेलच.
Source : Marathi news