चिंता आणि चिता
Like
Like Love Haha Wow Sad Angry
59

Stop Worrying About Death? Some gifted children seem preoccupied with death and dying and getquite upset when they think about it.

चिंता आणि चिता
marathi articles पूर्वजांनी म्हटले आहे कि चिता आणि चिंता यामध्ये फक्त  अनुस्वाराचा फरक असला तरी चिते पेक्षा चिंता अधिक  भयानक आहे. चिता माणसाला एकदाच कायमचे मारते:परंतु  चिंता प्रत्येक क्षणी मारत असते.प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या  गोष्टींची चिंता असते. मात्र तिच्या आहारी किती जायचे हे  आपणच ठरवायचे असते, कारण चिंता करण्याची सवय  येकदा  का जडली कि त्यातून सुटणे अवघड असते. चिंते मुळे  मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि त्याचा परिणाम शारीरिक  स्वाथ्या वर होतो. म्हणून चिंते मध्ये अनेक विकारांचे मूळ  असते. चिंता ताण-तणाव यामुळे शरीरातील चयापचयाच्या  क्रिये मध्ये असंतुलन निर्माण होते. त्यामुळे पित्त प्रकृती  वाढते, त्याचा अतिरेक झाला कि पेप्टिक अल्सरसारखे आजार  होतात. तेवढेच नाही तर रक्ता मधील साखर वाढण्याचे परिणाम सुद्धा दिसतात, झोप न येणे, उच्च रक्तदाब, डोके दुखी, हृद्य विकार, अस्थमा या व्यतिरिक्त ईतर मानसिक विकार जडण्याच्या मागे चिंता हेच मुख्य कारण असते. सतत चिंता केल्यामुळे त्वचे वर सुरकुत्या पडतात. केस अकाली पांढरे होण्यास सुरवात होते. वृद्धापकाळ येण्या पूर्वीच व्यक्तीच्या चेहर्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात, म्हणून चिंतेतून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे उचित होईल. म्हणूनच विकारांचे मूळ हीच चिंता होय.

आनंदाचे उगम स्थान
आनंदा तुला शोधू कुठे! अलीकडे आनंद बाह्य जगात शोधण्याची चुकीची प्रथा पडू पहात आहे. त्यापेक्षा स्वत:चे व्यक्तिमत्व बदलल्यास आंतरिक सामाधान जाणवू शकते. त्या करीता आपल्या काही वाईट सवयी चा त्याग करावयास पाहिजे. वाईट सवयी चे जाणीव पूर्वक निरीक्षण करून त्या नष्ट करून चांगल्या सवयी जडवून घ्याव्या लागतील, त्याकरिता काही योजना आखाव्या लागतील, व आत्मसात कराव्या लागतील तेव्हा निश्चित यश येईल, चांगली सवय वाईट सवयी वर मात करू शकते. आपल्या आरोग्यावर सुद्धा वाईट सवयींचे परिणाम होत असतात. त्यामुळे अंतीम यश गाठण्यास बर्याच अडचणी येतात. त्यासाठी मना पासून मुकाबला करायला हवा. काही गोष्टी नियमाने सातत्याने रोज केल्यास त्याचे रुपांतर अंगभूत सवयीत होते. आपल्या सानिध्यात असणार्याला हि त्याच सवयी जडतात.वाईट सवयी आपल्याला फार हानिकारक असतात. प्रात:काळी नेहमी हसत मुखाने उठावे. परमेश्वराचे स्मरण करावे. ईतरांपेक्षा आपण फार सुखी आहोत, असेच विचार मनात आणावेत.एकविसाव्या या शतकात फार झपाट्याने बदल होत आहे, तेव्हा आपण सामाधानी आहोत हीच कल्पना नेहमी मनात असू द्या. तरच आनंदाचे क्षण उपभोगायला मिळतील. वर्तमानात सुख आणि यश आहे, हे लक्षात ठेवा.

Source: Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
59
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu