श्री गणेश स्तोत्र




Like
Like Love Haha Wow Sad Angry
10

shri ganesha

|| श्री  गणेश स्तोत्र ||
साष्टांग नमन माझे गौरीपुत्रा विनायका  | भक्तीने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||१||
प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत तें | तिसरें कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पांचवे श्री लंबोधर सहावे विकट नांव तें |  सातवे विघ्न राजेंद्रआठवे घूम्रवर्ण तें ||३||
नववे श्री भालचंद्र धावे श्री विनायक | अकरावे गणपती बारावे श्री गजानन ||४||
देवनावें अशी बारा तीन संध्या म्हणे नर | विघ्न भीती नसे त्याला प्रभो! तू सर्व सिद्धिद ||५||
विद्यार्थ्याला मिले विद्या  धनार्थ्याला मिळे धन |  पुत्रयार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती ||६||
जपतां गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ | एक वर्ष पूर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ||७||
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हें | श्रीधराने मराठिंत पठण्या अनुवादीले ||८||

Source : Marathi Unlimited.

|| श्री ||
दुर्वांकुरे घेउनी पुष्पमाला  | आलो असे मी तव दर्शनाला |
विद्या व धनाने मज तोषवावे  | लंबोधरा हे वरदान द्यावे || १||
पूजा यथांसांग करावयाला  | मी मूढ आहे स्तुती गावयाला |
माझे वृधा दोष ना आठवावे  |  लंबोधरा हे वरदान द्यावे || २||
मी आठवीतसे तव रूप आधी  |  ताकावयाला अवघ्या उपाधी |
हेतू मनीचे फ्ल्वीत जावे  |  लंबोधरा हे वरदान द्यावे  ||३||
बाधा न होवो तव संकटाची  |  स्फूर्ती  मिळावी पथ चालण्याची |
मी जीवनी या यशवंत व्हावे  |  लंबोधरा हे वरदान द्यावे  || ४||
सत संगतीचा मज लाभ व्हावा  |  माझ्या वरी क्रोध तुझा नसावा |
मायेत या व्यर्थ न गुंतवावे  |  लंबोधरा हे वरदान द्यावे ||५||
हकारीतो मी तुज यावयाला  |  वंदुनी प्रेमे चरणा बुजांला |
अज्ञान माझे अवघे हरावे |  लंबोधरा हे वरदान द्यावे   ||६||
गंभिर दीप्ती तव मोहविते  |  चित्तास या चंचल शांतविते  |
मायातुनी हे मज उद्धरवी  |  लंबोधरा हे वरदान द्यावे  ||७||
मूर्ती तुझी नित्य पहात जावी  |  नेत्रे सदा मोहक हि प्रभावी  |
आशिर्वर्ये मंगल नित्य व्हावी   |  लंबोधरा हे वरदान द्यावे  ||८||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
10




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu