मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक संजय भाऊराव सूरकर यांचे आज सकाळी चित्रपटाच्या सेटवर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ‘लाखी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने सूरकर पुण्यात आले होते. गेले काही दिवस येथे चित्रीकरण सुरू होते. आज त्याच्या सेटवरच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने अभिनेते सचिन खेडेकर आणि इतर युनिटच्या लोकांनी तातडीने रत्ना मेमोरियल रूग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. ‘रावसाहेब’,‘आपली माणसं’, ‘यज्ञ’,‘एक डाव संसाराचा’, ‘आवाहन’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘आनंदाचे झाड’ ‘सखी’, ‘आईशप्पथ’, ‘तांदळा’, ‘सुखांत’ ‘रानभूल’आणि नुकताच येऊन गेलेला ‘स्टॅँडबाय’हा हिंदी चित्रपट अशी त्यांची विपुल चित्रसंपदा आहे.
Source : Marathi Unlimited.