सचिनच्या फॉर्मची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र यापूर्वी सचिननं अशा चर्चेला आपल्या धावांनी उत्तर दिलं होतं. मैदानावरही त्याची एकाग्रता तो ढळू देत नसे. बेंगळुरु कसोटीत मात्र बाद झाल्यावर सचिन काहीसा रागावलेला दिसला. अनेकजण आता सचिनच्या रागाचं कारण शोधू पहात आहेत. अंपायरनं चुकीचा निर्णय दिला असला तरी खाली मान घालून पँव्हेलियनकडे परतणारा सचिन आपल्याला परिचित आहे. मात्र बेंगळुरु कसोटीत सचिन क्लिन बोल्ड झाला आणि त्याची रिऍक्शन चर्चेला निमित्त झाली. बेंगळुरु कसोटीत पहिल्या इनिंगमध्ये सचिन बाद झाल्यावर सुनिल गावसकर यांनी मास्टरब्लास्टरच्या वाढत्या वयावर बोट ठेवलं होतं. कॉमेंट्रेटर संजय मांजरेकरनेही सचिनच्या फॉर्मवर टिप्पणी केली होती. यामुळेच लागोपाठ क्लीन बोल्ड झाल्यावर सचिन रागावर संयम ठेवू शकला नाही.
Source : Marathi News.