Rava Paneer Vadya :
Paneer nuggets crunchy from outside and soft from inside. kids love these crunchy paneer nuggets as snack and tastes delicious during the tea time. Follow this procedure for preparing this lovely dish.
साहित्य :- एक वाटी रवा, दोन वाट्या दुध, अर्धी वाटी किसलेले पनीर, चिमुटभर हिंग, एक मोठा चमचा लसून, आल, हिरव्या मिरच्यांची पेस्ट चवीनुसार मीठ, सारनासाठी एक वाटी वाफवलेली चना डाळ, दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तळणासाठी तेल.
कृती :- कढईत तेल टाकून रवा गुलाबी रंगात परतून घ्यावा. त्यातील निम्मा रवा दुधात मिसळून दाट होईपर्यंत, शिजवावा. गार झाल्या नंतर पनीर, उरलेला रवा, हिंग, आल, लसून, मिरच्यांची पेस्ट टाकावी. मीठ टाकून व्यवस्तीत मिसळून घ्यावे. त्याचे गोळे बनवावे. सारण तयार करताना वाफवलेल्या डाळीत हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडे मीठ घालून एकत्र करून घ्यावे. हे सारण तयार केलेल्या गोळ्यान मध्ये भरून त्याला चपटा आकार द्यावा. तव्यावर तेल टाकून श्यालोफ्राय करून घ्यावे. खोबरे किसाच्या ओल्या चटणी बरोबर खायला द्यावे.
सुगरणी चा दरबार.
Source : Marathi Unlimited.