अबू आझमी आणि राज ठाकरे यांच्यातला प्रांतिय वाद आता नवा राहिलेला नाहीय. शुक्रवारी राज ठाकरेंनी बिहारच्या मुख्य सचिवांना केलेल्या मज्जावानंतर पलटवार करण्याची संधी सोडतील ते अबू आझमी कसले…
‘राज ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नक्षलवादी, फुटीरतावादी म्हणून घोषित करावे. राज ठाकरे हे नक्षलवादाचे पुजारी आहेत. मुंबई पोलिसांना दुसर्या राज्यात जायचे असेल तर त्यांनी तसे तेथील सरकारला कळवावं. तर, ‘राज यांनी परप्रांतीयांना घुसखोर म्हणण्याची चूक करु नये, लोकांना देशात कुठेही जाण्याचा, राहण्याचा, काम करण्याचा अधिकार आहे. बिहारच्या मुख्य सचिवांनी पाठवलेल्या पत्रात राजनं ढवळाढवळ करु नये. त्यासाठी राज्य सरकार आहे’ असा टोला काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी राज ठाकरेंना लगावलाय. शुक्रवारी राज ठाकरे यांनी सीएसटी हिंसाचार प्रकरणी बिहारमध्ये दंगेखोरांना अटक करण्यासाठी मुंबई पोलीस गेले असता. बिहारच्या मुख्यसचिवांनी त्यांना मज्जाव केला होता. तसेच कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
Source : Marathi News.