केंद्राने डिझेलमध्ये पाच रुपयांची वाढ केल्यामुळे ठाणेकरांना अधिकचे पैसे मोजावे लागत होते. मात्र आता पेट्रोल आणि डिझेलवरील जकात कर अर्धा टक्क्यावर आणण्याचा ठराव अखेर महासभेत मंजूर झाला आहे. त्यामुळे आता ठाणेकरांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
पेट्रोल, डिझेलवरील कर हा अर्धा टक्क्यावर आल्याने आता ठाण्यात पेट्रोल ३.९७ रुपयांनी आणि डिझेलदेखील सुमारे १.९४ रुपयांनी स्वस्त होणार आहे. सीएनजी गॅसलादेखील किलोमागे सुमारे १.0३ रुपये कमी मोजावे लागणार आहेत.
Source : Marathi Unlimited