ज्येष्ठ समावसेवक अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील दुरावा वाढतच आहे. टीम अण्णा फुटण्यासाठी अण्णांनी अरविंद केजरीवाल यांना दोषी ठरविले आहे. राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मुद्यावरुन भ्रष्टाचारविरोधी आंदोलन मागे पडले आणि सदस्य विखुरले, असे अण्णांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहीले आहे. गेल्या दोन वर्षांपासून युपीए सरकारने भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न चालविले होते. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. सतत दोन वर्षे कॉंग्रेस सरकारच्या नाकी नऊ आणलेल्या टीम अण्णाची दुर्दशा झाली आहे. आता टीम अण्णा मधील युद्ध काही थांबतच नाही. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील दुरावा हा वाढतच चालला आहे.
Source : Marathi Unlimited.