नितीन गडकरी सलग दुसर्यांदा पक्षाध्यक्ष होणार
भाजपचे नितीन गडकरी यांचा सलग दुसर्यांदा पक्षाध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा करणारी पक्ष घटनादुरुस्ती आज भाजपाने सूरजकुंडच्या राष्ट्रीय परिषदेत मंजूर केली. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकांना भाजपा गडकरी यांच्याच नेतृत्वाखाली सामोरी जाणार, हे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांच्या कारकीर्दीत घटनेत दुरुस्ती करून अध्यक्षांचा कार्यकाळ दोन वर्षांवरून तीन वर्षे करण्यात आला होता.
Source : Marathi News Updates.