जागतिक पातळीवर भारताकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. पण या सर्व अपेक्षांवर भारत खरा उतरू शकत नसल्याची खंत इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सध्याची देशाची आर्थिक परिस्थिती १९९१ पेक्षाही खराब असल्याचं नारायण मूर्ती यांनी म्हटलंय. यासाठी सरकारी उदासीनता कारणीभूत ठरतेयं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय. सरकारी पातळीवरच्या निरुत्साहामुळे भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर खालावली असल्याचंही ते म्हणाले.
Source : News Tv.