Mushroom Noodles :
This mushroom noodles recipe is simple and easy to make like most noodle recipes. no extensive chopping of veggies here, as we need to only chop the mushrooms and spring onions along with the usual garlic, ginger and green chilies.
साहित्य :- ४०० ग्रंम मशरूम, १०० ग्रंम नुडल्स,एक कांदा, पाच लसून पाकळ्या, पार्सोलीची तीन पाने, कोथिंबीर, दोन चमचे लनी, थोडे चीज, तीन चार लवंगा, तिखट, मीठ आणि मिरे पूड.
कृती :- मशरूम स्वच्छ धुवून घ्यावे व त्याचे तुकडे करावे. नुडल्स कढईत घेवून त्यावर एक चमचा लोणी आणि थोडेसे मीठ घालावे. एक वाटी पाणी घालून नुडल्स उकडून घ्यावे प्यन मध्ये एक चमचा लोणी घेऊन त्यात लवंगा,बारीक चिरलेला कांदा, आणि लसून घालून परतून घ्यावे. हे जिन्नस चांगले परतल्या नंतर त्यात मशरूम घालावे, मशरूम परतल्या नंतर मीठ, मिरेपूड घालावी. ग्यस बंद करावा. एक बाउल घेऊन त्याच्या कडेने पार्सोलीचे पान लावावीत, उकडलेली नुडल्स बाउल मध्ये घेऊन त्यात परतलेली मशरुम्स घालावी. थोडेसे तिखट भूरभूरून त्यावर चीज किसून घालावे, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी, असा हा सजवलेला बाउल सर्व्ह करावा.
Source : Marathi Unlimited.