मुंबईत भाजप नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, जयवंतीबेन मेहता, शायना एन. सी, अतुल शहा यांना पोलिसांनी अटक केली. मंत्रालय बंद पाडण्यास गेलेल्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरवाढ आणि सिलिंडर सबसिडीवर आणलेल्या मर्यादा या विरोधात भाजप, डावे आणि समाजवादी पक्षाने भारत बंद पुकारला आहे. मुंबईत बुधवारी सकाळपासून जनजीवन सुरळीत सुरु आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व मनसेने भारत बंदच्या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय़ घेतला होता.
Source : Marathi Unlimited.