मनमोहन सिंग यांनी मीडियावर खापर फोडली
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर होणारे आरोप, त्यानंतर मनमोहन सिंग यांना विरोधकांनी `टार्गेट` करणं, ह्या साऱ्याचं खापर मनमोहन सिंग यांनी मीडियावर फोडलं आहे. माध्यमांनी सनसनाटी बातम्या देण्याचा मोह टाळत समाजात व देशात आपल्या लिखाणाने, बातम्यामुळे दुही माजणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी मीडियाला दिला आहे.
ते म्हणाले, माध्यमांचे महत्त्व मोठे असून त्यांची भूमिका देशासाठी महत्त्वाची असते. सातत्याने जागरुक राहत सामाजिक सलोखा राखण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि संतुलित वार्तांकन करणे गरजेचे आहे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे.
Source : TV News Channel.