इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले. केंद्रातील यूपीए सरकारवर विशेषतः काँग्रेसवर त्यांनी टीकेची झोड उठवली. काँग्रेसने कोणताही निर्णय घेताना आमच्याशी सल्लामसलत केली नाही. आमचा त्यांनी नेहमी अनादर केला. सरकारने नेहमी जनहिताविरोधात निर्णय घेतले. त्यामुळे आम्ही अशा सरकारमधून बाहेर पडत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
Source : Online News.