महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज टिकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंबानेच घुसखोरी केली आहे. मात्र, शिवसेनेन त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे. ठाकरे कुटुंबीय मूळचे बिहारचे असून त्यांनी तत्काळ महाराष्ट्रातून बाहेर पडावे, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. ठाकरे कुटुंबीयाने महाराष्ट्रात घुसघोरी केली आहे. मुंबई देशाची आहे. येथील जनतेची ठाकरे दिशाभूल करीत आहे, असा आरोप लालूयादव यांनी केला.
Source : Marathi News Tv.