कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये




Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

marathi love songs

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रुदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे

स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपनास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी
आणि त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दीशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठांतुनही मग
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत

कुणाला इतकीही माझी म्हनू नये
की त्याचे मीपण आपन विसरून जावे
त्या संभ्रमात त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे

पण………
कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे
दूर दूर आवाज दिला तरी
आपले शब्द जागीच घूमवेत
आपले शब्द जागीच घूमवेत.

Source : Marathi Kavita Sangrah.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
4




, , , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu