सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. मात्र, पंतप्रधानांनी राजीनामा दिल्याखेरीज संसद चालू न देण्याचा पवित्रा भाजपाने आज कायम ठेवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर स्वराज यांच्याशीही संपर्क साधला; मात्र भाजपाचे मन त्या वळवू शकल्या नाहीत. भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले, संसदेत आणि संसदेबाहेर आम्ही आपला लढा पुन्हा तीव्र करू. आमचा लढा कायमच राहणार आहे. पंतप्रधानांना जाब विचारणे, त्यांना त्यांच्या राजकीय, घटनात्मक व नैतिक जबाबदारीची जाणीव करून देणे विरोधकांचे घटनात्मक व संसदीय कर्तव्य आहे. ही केवळ राजकीय चिखलफेक नाही, अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी मनमोहन सिंग यांना प्रत्युत्तर दिले.
Source : Marathi Updates.