करीना आणि मधुर भांडारकरने मुंबईतील एका सार्वजनिक गणेश उत्सवाला भेट दिली. करीना कपूरचा ‘हिरॉईन’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. त्यानिमित्ताने करीना आणि मधुर भांडारकरने वांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. चित्रपटाला चांगले यश मिळावे यासाठी करीनाने गणरायाकडे प्रार्थना केली. ‘हिरॉईन’ या चित्रपट प्रमोशन करिता ते आले होते. हिरॉईन या चित्रपटात करीनाने माही अरोरा या अभिनेत्रीची भूमिका साकारली असून या चित्रपटात हिरॉईनच्या आयुष्यातील चढ-उतार रेखाटले आहेत
Source : Online News