Kamla Bhog Food recipes :
Kamala bhog is orange flavoured rasgulla. “Rasgulla” is a popular Bengali sweet. It is only sweet dumplings made of curds. There are numerous varieties of rasgulla,for example, RajBhog, Komola Bhog and etc.
साहित्य :- एक वाटी पनीर, एक चमचा रवा, एक चमचा मैदा, दोन वाट्या साखर, लहान साखर फुटाणे, संत्र्याचा अर्क, जिलबीचा रंग.
कृती :- रवा पनीर मिक्सर मधून काढावा किंवा हाताने एकजीव करावा, याचे मध्यम आकाराचे गोळे बनवावे, दोन वाट्या साखरे मध्ये पाच वाट्या पाणी घालून पाक तयार करावा, पाक थोडा पातळच असावा, वरील गोळ्यां मध्ये एक एक साखर फुटाणा घालावा. आणि परत घट्ट गोळे बनवावेत. हे गोळे गरम पाकात घालावेत. थोडा वेळ उकळू द्यावेत. थंड झाल्यांनतर दोन किंवा तीन थेंब संत्र्याचा अर्क घालावा. गोळे तयार करतानाच त्यात संत्र्याची पावडर व जिलबीचा रंग घालावा. झालेत कि कमला भोग तयार, हे फार रुचकर लागतात.
Source: Marathi Unlimited Food Recipes.